शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदी सप्ताहादरम्यान ३४ प्रकरणे दाखल

By admin | Updated: October 8, 2014 23:27 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात २ आॅक्टोबरला गांधी जयंतीपासून ते ८ आॅक्टोबरपर्यंत राबविलेल्या दारूबंदी सप्ताहादरम्यान अवैध दारूविक्री, साठा, वाहतूक आणि हातभट्टीची दारू

गोंदिया: राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात २ आॅक्टोबरला गांधी जयंतीपासून ते ८ आॅक्टोबरपर्यंत राबविलेल्या दारूबंदी सप्ताहादरम्यान अवैध दारूविक्री, साठा, वाहतूक आणि हातभट्टीची दारू गाळणाऱ्यांविरूद्ध ३४ प्रकरणे दाखल केली. यात २७ जणांना अटक करून १ लाख १९ हजार ७४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.प्राप्त माहितीनुसार, निवडणुकीच्या काळात मद्यच्या प्रलोभनातून मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा प्रकार सुरू असतो. हे टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनात जिल्हाभरात गांधी जयंतीपासून एक सप्ताहभर विशेष दारूबंदी मोहीम राबविण्यात आली. या जिल्ह्यात विविध ठिकाणी ३४ कारवाया करण्यात आल्या. गोंदियाचे निरीक्षक सुरेश डोंगरे यांच्या पथकाने ११ प्रकरणे दाखल केली. त्यात ८ आरोपींना अटक झाली. दुय्यम निरीक्षक (ग्रामीण) मंडलवार यांच्या पथकाने ४ प्रकरणे, दु.निरीक्षक (शहर) १ तसेच निरीक्षक देवरी यांनी ३ प्रकरणे, दु.निरीक्षक देवरी (क्र.१) यांनी ८, तर दु.निरीक्षक देवरी (क्र.२) यांनी ७ प्रकरणे दाखल केली आहेत.गोंदियातील ११ पैकी ८ वारस प्रकरणांमध्ये १८० लिटर मोहा दारू, १२४० लिटर मोहा सडवा असा एकूण ३७,०९० रुपयांचा ऐवज जप्त केला. जिल्ह्यातील सर्व प्रकरणांत अटक केलेल्या आरोपींमध्ये ताराचंद दुलीचंद तिघाटे रा.गोंडीटोला, गरीबदास लटारू उके रा.सेंद्रीटोला, विनोद शिशुपाल शेंडे रा.दांडेगाव, भीमराज जरकू शेंडे रा.दांडेगाव, राजू व्यंकटराव पल्लीवार रा.दांडेगाव, कनिलाल गोमा वाढवे रा.चिचटोला, रमेश जंगलू शेंडे रा.गोंडमोहाडी, नरसैय्या परशुराम मुत्तीवार रा.धापेवाडा, लंकेश हेमचंद नागपुरे रा.चांदनीटोला, सदाराम सावंत देवाघाटी रा.भाद्याटोला, विनोद पन्नालाल उके रा.आसोली, मोतीलाल नेवारे, जितेंद्र वेलावे, औदास गजभिये, रमेश मच्छीरके, केशुलाल चक्रवर्ती आदींना अटक करण्यात आली.ही मोहीम अधीक्षक धार्मिक यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक सुरेश डोंगरे, दु.निरीक्षक निकुंभ, दु.निरीक्षक ग्रामीण मंडलवार, स.दु.निरीक्षक हुमे, जवान कांबळे, पागोटे, ढाले, देवरी विभागातील निरीक्षक गोटमारे, दु.निरीक्षक बोलधन, दु.निरीक्षक बोडेवार, स.दु.निरीक्षक रहांगडाले, ढोमणे, मुनेश्वर, वाहनचालक सोनबरसे आदींनी यशस्वी केली. (जिल्हा प्रतिनिधी)