पावसामुळे बोदलकसा तलाव ओव्हरफ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:24 IST2018-08-29T00:23:29+5:302018-08-29T00:24:03+5:30
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तिरोडा तालुक्यातील बोदलकसा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. तर बोदलकसा नाल्याला पूर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती.

पावसामुळे बोदलकसा तलाव ओव्हरफ्लो
लोकमत न्यूज नेटवर्क
सुकडी-डाकराम : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तिरोडा तालुक्यातील बोदलकसा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. तर बोदलकसा नाल्याला पूर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. रविवारी (दि.२६) सायंकाळपासून परिसरात पाऊस सुरू आहे. मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला. त्यामुळे तालुक्यातील नदी नाले भरुन वाहत आहेत. इंदोरा-लेंडीटोली-मंगेझरी (गोविंदपूर) नाल्याला पूर आल्यामुळे मंगेझरी, गोविंदपूर, रुस्तमपूर, लेंडीटोला या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. शालेय विद्यार्थी व कामगारांना तिरोडा येथे जाता आले नाही. तर इंदोरा, बरबसपुरा, नाल्यावर पूर आल्यामुळे इंदोरा, बरबसपुरा हा मार्ग बंद झाला होता. चिखली-इंदोरा-भिवापूर नाल्यावरुन ३ फुट पाणी वाहत असून वाहतूक बंद ठप्प झाली होती. तालुक्यातील बोदलकसा जलाशय १०० टक्के भरले असून ओव्हरफ्लो झाला आहे.