शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कोरडा दुष्काळ सदृश्य स्थितीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST

जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधी सरासरी १३२७ मीमी पाऊस पडतो. ऐवढा पाऊस धान लागवडीसाठी अनुकुल मानला जातो. त्यामुळेच जिल्ह्यात धानाची सर्वाधिक लागवड केली जाते. यंदा एकूण १ लाख ७७ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाणार आहे. त्यापैकी २७ जुलैपर्यंत ७१ हजार हेक्टरवर धानाची रोवणी पूर्ण झाली असून अजून १ लाख १० हजार हेक्टरवरील रोवणी शिल्लक आहे.

ठळक मुद्दे१ लाख १० हजार हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या : ४५ टक्के पावसाची तूट : सिंचन प्रकल्पात मोजकाच साठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वातावरणातील बदलाचा शेतीवर झपाट्याने होत आहे. मागील तीन चार वर्षांपासून पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. यंदा सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरविल्याने खरिपातील रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. जुलै महिना संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधी सरासरी १३२७ मीमी पाऊस पडतो. ऐवढा पाऊस धान लागवडीसाठी अनुकुल मानला जातो. त्यामुळेच जिल्ह्यात धानाची सर्वाधिक लागवड केली जाते. यंदा एकूण १ लाख ७७ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाणार आहे. त्यापैकी २७ जुलैपर्यंत ७१ हजार हेक्टरवर धानाची रोवणी पूर्ण झाली असून अजून १ लाख १० हजार हेक्टरवरील रोवणी शिल्लक आहे. जुलै महिना संपत आला तरी अद्यापही पावसाने मागील वर्षीची सुध्दा सरासरी गाठली नाही. परिणामी सुरू असलेल्या धानाच्या रोवण्या देखील पूर्णपण खोळंबल्या आहे. पावसाअभावी रोवण्या लांबत असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावित आहे. तर दुसरीकडे ७१ हजार हेक्टरवर केलेल्या रोवण्या सुध्दा पावसाअभावी वाळण्याच्या मार्गावर आला आहे. रोवणी केलेल्या धानाच्या बांध्यामध्ये आतापासूनच भेगा पडण्यास सुरूवात झाली असून उन्ह देखील चांगलेच तापत असल्याने शेतकºयांच्या समस्येत आणखी भर टाकली आहे. मागीलवर्षी देखील पावसाअभावी रोवण्या खोळंबल्या होत्या. तर याच कालावधीत ३२ हजार ६१६ हेक्टरवर रोवण्या झाल्या होत्या. त्यातुुलनेत यंदा रोवण्या जास्ती झाल्या असल्या तरी दमदार पावसाअभावी नदी, नाले, बोड्या कोरड्या पडल्या असल्याने समस्येत वाढ झाली आहे. सिंचन प्रकल्पाच्या पाण्याच्या मदतीने सध्या केलेली रोवण्या वाचविण्याचे काम सुरू आहे. एकंदरीत पावसाच्या अनिश्चिततेमुळे जिल्ह्यावर कोरडा दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.पावसाची वाढली तूटजिल्ह्यात १ जून ते २७ जुलै दरम्यान सरासरी ५५१.७३ मीमी पाऊस पडतो. मात्र त्या तुलनेत यंदा केवळ २९८.२९ मीमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या २९३.५१ मीमी पाऊस कमी पडला आहे. दोन महिन्यातच पावसाची जवळपास ४५ टक्के तूट निर्माण झाली आहे. तर आॅगस्ट महिन्यानंतर पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. त्यामुळे महिनाभरात पाऊस सरासरी गाठणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाची तूट वाढत चालली असल्याने कोरड्या दुष्काळाचे सावट सुध्दा अधिक गडद होत चालले आहे.सिंचन प्रकल्पात २५ टक्केच साठाजिल्ह्यातील शेतकऱ्यांची मदार बऱ्याच प्रमाणात सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर अवलंबून असते. मागीलवर्षी शेवटी शेवटी चांगला पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा पुरेसा पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे रोवणीसाठी या सिंचन प्रकल्पांचे पाणी यंदा सोडता आले. सध्या स्थितीत जिल्ह्यातील मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. इटियाडोह २६ टक्के, सिरपूर २५ टक्के, पुजारीटोला २२.९६ टक्के, कालीसरार ०० टक्के पाणीसाठा आहे.

रोवणी वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडमागील दोन महिन्यापासून जिल्ह्यात पाऊस पाठ दाखवित असल्याने त्याचा धानाच्या रोवणीवर परिणाम झाला आहे. ज्या शेतकºयांनी सुरुवातीला त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सिंचनाच्या सोयीच्या मदतीने रोवणी आटोपली.पण मागील वीस दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला असल्याने केलेली रोवणी वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड सुरू असल्याचे चित्र आहे.

आठ दिवसात पाऊस न झाल्यास स्थिती गंभीरजिल्ह्यात येत्या आठ दहा दिवसात दमदार पाऊस न झाल्यास जिल्ह्यात पिकांची गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी केलेली रोवणी वाळत चालली आहे. तर दुसरीकडे रोवणी करण्याचा कालावधी हळूहळू निघून जात असताना १ लाख १० हजार हेक्टरवरील रोवण्या शिल्लक असल्याने शेतकऱ्यांच्या समस्येत अधिक वाढ झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊस