शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बाहेर राज्यातून येणाऱ्यांवर पोलिसांची ड्रोनव्दारे नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योग धंदे, बांधकाम सर्व बंद पडल्याने बाहेरील राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर, कामगार आपल्या राज्यात व गावाकडे परतत आहे. त्यामुळे परराज्यातील मजुरांचे लोंढे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देजिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी : कोरानाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने शासन आणि प्रशासनातर्फे युध्दपातळीवर उपाययोजना सुरु आहेत. गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. तसेच जिल्ह्याला लागून असलेल्या सीमा देखील सील करण्यात आल्या आहेत. या सर्व ठिकाणी पोलीस विभागाव्दारे ड्रोनव्दारे नजर ठेवली जात आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योग धंदे, बांधकाम सर्व बंद पडल्याने बाहेरील राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर, कामगार आपल्या राज्यात व गावाकडे परतत आहे. त्यामुळे परराज्यातील मजुरांचे लोंढे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागातर्फे सुध्दा उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहेत.यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस विभागातर्फे ड्रोनची मदत घेण्यात आली आहे. शहर परिसरात ३, तिरोडा १, देवरी १, आमगाव, सालेकसा, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, गोरेगाव, रावणवाडी परिसरात प्रत्येकी एका ड्रोनव्दार नजर ठेवण्यात आली आहे. तसेच या माध्यमातून गर्दीवर सुध्दा नियंत्रण ठेवले जात आहे.किराणा दुकान, भाजीबाजार, मेडिकल या परिसरात होणाºया गर्दीवर सुध्दा ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. जिल्ह्यातील सर्व आंतरराज्यीय आणि जिल्ह्याची सीमा पूर्णत: बंद करण्यात आली आहे. जवळपास ५० ते ६० ठिकाणी नाकाबंदी करुन बाहेरुन येणाऱ्यांची चौकशी केली जात आहे. तसेच विनाकारण बाहेर पडणाºयांवर सुध्दा कारवाई केली जात आहे.मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहचविण्याची सोयजिल्ह्यातील विविध भागातील मजूर इतर राज्यात रोजगारासाठी गेले होते. मात्र लॉकडाऊनमुळे आता ते आपल्या गावाकडे पोहचत आहेत. वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प असल्याने हे सर्व मजूर रेल्वे मार्गाने पायीच येत आहे. अशा पायी येणाºया मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहचविण्याची सोय देखील पोलीस विभागाकडून केली जात आहे. तर परराज्यातील मजुरांवर सुध्दा नजर ठेवली जात असून त्यांना आश्रयस्थळांपर्यत पोहचवून त्यांची राहण्याची आणि भोजनाची सोय पोलिसांकडून केली जात आहे.जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले असल्याने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, घरातच राहून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत करावी.- मंगेश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक गोंदिया.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस