शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

भिकेतून जमविलेल्या पैशाने दिला पुतळा दान

By admin | Updated: January 28, 2015 23:35 IST

गेल्या सात-आठ वर्षापासून घराबाहेर राहून आणि भिक्षा मागून जगत दोन पैसे जमविणाऱ्या सुकडी-खैरी या गावातील आत्माराम कवळू गणवीर या व्यक्तीने आपल्या औदार्याचा परिचय दिला.

रमाबाईचा पुतळा : सुकळीच्या आत्मारामचे असेही औदार्यमुन्नाभाई नंदागवळी - बाराभाटीगेल्या सात-आठ वर्षापासून घराबाहेर राहून आणि भिक्षा मागून जगत दोन पैसे जमविणाऱ्या सुकडी-खैरी या गावातील आत्माराम कवळू गणवीर या व्यक्तीने आपल्या औदार्याचा परिचय दिला. त्यांनी बौध्द समाजाला मातोश्री रमाबाईचा पुतळा दान देऊन समाजापुढे आपले अनोखे औदार्य दाखवून दिले.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बाराभाटीजवळील सुकळी-खैरी येथील रहिवासी असणारे आत्माराम गणवीर यांनी गावात रमाबाईचा पुतळा स्थापन करावा अशी इच्छा व्यक्त केली. मात्र त्यासाठी कोणी पुढाकार घेतला नाही. स्वत:जवळ पुतळा उभारण्याइतपत पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वत: रेल्वेमध्ये भिक मागून पैसे जमविले आणि सुकळीतील बौध्द समाजाला मातोश्री रमाबाईच्या पुतळ्यासाठी १३ हजार रुपये दिले. गणवीर हे स्वत:च्या घरून गेल्या सात-आठ वर्षापासून बाहेर आहेत. कुठेही मिळेल तिथे खाणे व राहणे हा त्यांचा नित्यक्रम ठरला होता. असे करता-करता त्यांनी रेल्वेमध्ये भीक मागणे सुरू केले. भिकेतून मिळालेल्या पैशामधून त्यांनी स्वत:च्या नातवंडाला मोटारसायकल घेवूून दिली. त्याचबरोबर नातीच्या लग्नसमारंभाला पैशाची मदत केली असेही गणवीर यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी केला सत्कारगणवीर यांच्या देणगीतून उभारलेल्या रमाबाईच्या पुतळ्याचे अनावरण जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आत्माराम गणवीर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. ते भिकारी नसून एक समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ता असल्याचे गौरवोद्गार यावेळी अनेकांनी काढले.