डॉक्टरांनी काढला मोर्चा

By Admin | Updated: November 17, 2016 00:19 IST2016-11-17T00:19:40+5:302016-11-17T00:19:40+5:30

आपल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रव्यापी आयएमए सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले होते.

The doctor has removed the front | डॉक्टरांनी काढला मोर्चा

डॉक्टरांनी काढला मोर्चा

गोंदिया : आपल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रव्यापी आयएमए सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले होते. शासनाने वचनपूर्तीची हमी मागे घेण्यात आली. सातत्याने पाठपुरावा करूनही आतापर्यंत वचनपूर्ती करण्यात आली नाही, उलट शासनाने एमसीआय बरखास्त करून त्याऐवजी एनएमसी (नॅशनल मेडीकल कमिशन) नेमण्याचा घाट रचल्याने आज बुधवारी वैद्यकीय व्यावसायिकांनी गोंदियाच्या रस्त्यांवर मोर्चा काढला.
वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया यांनी या मोर्च्याला हिरवी झेंडी दाखवून मोर्च्याची सुरूवात केली. बुधवार सकाळी ११ वाजता केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातून या मोर्च्याला सुरूवात करण्यात आली. मोर्चा केटीएस, नेहरू चौक, जमनालाल बजाज पुतळा, गोरेलाल चौक दुर्गा चौक, नगर परिषद, गांधी प्रतिमा होत पोलीस ठाणे मार्ग गोरेलाल चौकातून ही रॅली केटीएस मध्ये पोहचली. गोंदियातील सर्व डॉक्टर या रॅलीत सहभागी झाले होते.
एमसीआय ही मॉडर्न मेडीसिनची नियामक स्वायत्त संस्था असून त्यात लोकशाही पद्धतीने निवडलेल्या सभासदांसोबतच काही सरकारी नामनिर्देशित सभासद असतात. एनएमसीमध्ये (नॅशनल मेडीकल कमिशन) केवळ सरकारी नामनिर्देशित सभासद राहणार असून त्यातही ६० टक्के प्रतिनिधी गैरवैद्यकीय क्षेत्रातील राहणार आहेत. सरकारी एकाधिकार असणाऱ्या एनएमसीची स्थापना लोकशाहीला गालबोट आहे. वैद्यकीय शिक्षण व सेवा धोक्यात आणण्याचा निर्णय असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एनएमसी केवळ सरकारी नामनिर्देशित सभासदांची कमिटी आहे. ५० टक्के सभासद बिगर वैद्यकीय. खासगी मेडीकल कॉलेजांना संपूर्ण स्वायत्तता व ६० ते ९९ टक्के फी वाढीचा अधिकार, आयुर्वेद, युनानी, होमियोपॅथी व इतर पॅथींना अ‍ॅलोपॅथीचे औषधे वापरण्यास मुभा, भरमसाठ फी असलेले वैद्यकीय शिक्षण आणखी महागले आहे. वैद्यकीय सेवा महाग व रूग्णांच्या जीवाला धोका करणाऱ्या सदर कमिटीला आयएमएचा विरोध आहे. नॅशनल मेडीकल कमिशन रद्द करणे, वैद्यकीय व्यावसायिकांची स्वायत्तता अबाधित ठेवून एमसीआयमध्ये योग्य बदल करणे. डॉक्टरांनी छोटी हॉस्पिटल्स व फॅमिली डॉक्टरला क्लिनिकल एस्टॉब्लिशमेंट अ‍ॅक्टमधून वगळावे, त्यामुळे आरोग्य सेवा महागणार नाही, पीसीपीएनडीटी कायद्यात बदल, गंभीर शिक्षा केवळ गर्भलिंग निदान करून गर्भपात करणाऱ्यांसाठीच असावी. कागदोपत्री चुकांना गुन्ह्याच्या प्रमाणात शिक्षा व्हावी. डॉक्टर्स व हॉस्पिटल्ससाठी केंद्रीय सुरक्षा कायदा, क्रॉसपॅथीला विरोध आदी मागण्यांचा समावेश होता.या मोर्चात आयएमएचे अध्यक्ष डॉ. आभा सोनकिया, माजी अध्यक्ष डॉ. घनश्याम तुरकर, डॉ. लक्ष्मी गुप्ता, डॉ. राजेंद्र जैन, डॉ. अशोक चौरसिया, डॉ. मोहन, डॉ. सुधीर जोशी, डॉ. उमेश शर्मा, डॉ. चिटणवीस, डॉ. पाली बग्गा, डॉ. कोतवाल, डॉ. लता जैन, डॉ. राणा व इतर डॉक्टर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The doctor has removed the front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.