शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

उत्सव व जयंतीचे कार्यक्र म सार्वजनिक स्वरूपात नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

कार्यक्र मात समाजबांधवांनी सहभागी होऊ नये असे डॉ. बलकवडे यावेळी म्हणाल्या. पोलीस अधीक्षक शिंदे म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आला आहे. संचारबंदीचा हा काळ असल्यामुळे पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावे. मास्कचा वापर सर्वांनी केला पाहिजे.कोणत्याही प्रकारची रॅली काढण्यात येऊ नये, तसेच धार्मिक कार्यक्रमाचे सार्वजनिक स्वरूपात आयोजन करण्यात येऊ नये असे सांगितले.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : संपूर्ण जग कोरोना विषाणूचा सामना करीत आहे. आपल्या देशात आणि राज्यात देखील कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. अनेक लोक या विषाणूने बाधित होत असून काहींचा मृत्यू होऊन हे सत्र सुरूच आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक असून कोणीही घराबाहेर पडू नये. एप्रिल आणि मे महिन्यात येणारे विविध धर्माचे सण, उत्सव आणि जयंतीचे कार्यक्र म सार्वजनिक स्वरूपात साजरे करू नका. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील विविध धर्माच्या धर्मगुरूंची सभा आयोजित करण्यात आली.या वेळी त्या बोलत होत्या. पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी राहुल खांडेभराड व जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे उपस्थित होते. डॉ.बलकवडे पुढे म्हणाल्या, हा एप्रिल महिना आणि पुढील मे महिना कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.या महिन्यात बाधितांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. हे प्रमाण कमी करायचे असेल तर गर्दी टाळणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी कोणीही घराबाहेर पडू नये, म्हणजे कोरोना विषाणूची साखळी आपल्याला खंडित करता येईल.या एप्रिल महिन्यात व पुढील मे महिन्यात विविध धर्माचे सण, उत्सव आणि जयंतीचे कार्यक्र म आहेत ते सार्वजनिक स्वरूपात साजरे न करता कौटुंबिक स्वरूपात सामाजिक अंतर राखून साजरे करावे असे धर्मगुरूंनी समाजबांधवांना आवाहन करून कौटुंबिक स्वरूपात हे साजरे करण्याबाबत कळवावे. धार्मिकस्थळी पूजाअर्चा करण्याचे काम केवळ धर्मगुरूंनी करावे.त्या कार्यक्र मात समाजबांधवांनी सहभागी होऊ नये असे डॉ. बलकवडे यावेळी म्हणाल्या. पोलीस अधीक्षक शिंदे म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आला आहे. संचारबंदीचा हा काळ असल्यामुळे पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावे. मास्कचा वापर सर्वांनी केला पाहिजे.कोणत्याही प्रकारची रॅली काढण्यात येऊ नये, तसेच धार्मिक कार्यक्रमाचे सार्वजनिक स्वरूपात आयोजन करण्यात येऊ नये असे सांगितले.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी सहकार्याची ग्वाही उपस्थित सर्व धर्मगुरूंना यावेळी दिली. या सभेला जिल्ह्यातील विविध धर्माचे धर्मगुरू उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी