कठीण प्रसंगी घाबरू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST2020-01-07T05:00:00+5:302020-01-07T05:00:07+5:30
जीवनात सुख-दुख लागले असून कित्येक कठीण प्रसंग येतात. या कठीण प्रसंगांत जो घाबरला तो पुढे जाऊ शकत नाही व तेथेच थांबून राहिल्याने प्रगती होत नाही. याकरिता विद्यार्थ्यांनी कठीण प्रसंगांत घाबरू नये असे प्रतिपादन मुंबईचे डीआयजी हरीश बैजल यांनी केले.

कठीण प्रसंगी घाबरू नका
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जीवनात सुख-दुख लागले असून कित्येक कठीण प्रसंग येतात. या कठीण प्रसंगांत जो घाबरला तो पुढे जाऊ शकत नाही व तेथेच थांबून राहिल्याने प्रगती होत नाही. याकरिता विद्यार्थ्यांनी कठीण प्रसंगांत घाबरू नये असे प्रतिपादन मुंबईचे डीआयजी हरीश बैजल यांनी केले.
येथील गोंदिया एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित मनोहरभाई पटेल सैनिकी शाळेच्यावतीने आयोजित वार्षिकोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी गोंदिया एज्युकेश्न सोसायटीचे सचिव माजी आमदार राजेंद्र जैन, नमाद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. चतुर्वेदी, होमीयोपॅथी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. हर्षा कानतोडे, सैनिकी शाळेच्या मुख्याध्यापिका रुपा मिश्रा, सुबेदार रामगोविंद जगने, सुबेदार कैलाश जांगडे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती वंदनाने करण्यात आली. पुष्पगुच्छ आणि विद्यार्थ्यानी गायलेल्या स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यानी परेड करुन सर्वाचे लक्ष केंद्रित केले. पुढे बोलताना बैजल यांनी, विद्यार्थ्यांना आपल्या पालकांना गाडी चालविताना हेलमेट व सीट बेल्टचे महत्व सांगा. त्यांना आत्मग्लानी होऊन नक्कीच ते नियमांचे उल्लंघन करणार नाही असे सांगीतले.
मुख्याध्यापिका मिश्रा यांनी आजपर्यंत शाळा व विद्यार्थ्यांनी गाठलेल्या यशाची माहिती मांडली. संस्था सचिव जैन यांनी, विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करण्यासाठी खूप मेहनत करावी व आपल्या आई-वडिलांचे नावलौकीक करावे असे सांगितले.
पश्चात, सांस्कृतीक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सैनिकी शाळेत शिक्षण झालेल्या जुन्या विद्यार्थ्यांनी मंचावर आपल्या मुख्याध्यापिका व शिक्षकांसोबत डान्स करुन कार्यक्रमाचा आनंद लुटला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्याची सुरुवात होण्यापूर्वी शिक्षक खिलेंद्रगिरी ओंकारी व शिक्षक राजकुमार शेंडे यांनी पालकांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम ठेऊन पालकांनाही त्यात सहभागी करुन घेतले.
संचालन बरखा तिहाडे व राजकुमार शेंडे यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.