शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST

या रुग्णाला सुध्दा बुधवारी सुटी देण्यात येणार असल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. तब्बल ३९ दिवस ग्रीन झोनमध्ये असलेल्या गोंदिया जिल्ह्यात १९ मे रोजी मुंबई आणि पुण्याहून आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाचा शिरकाव झाला.त्यामुळेच आठवडाभरातच जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ६९ वर पोहचल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण होते.

ठळक मुद्देपुन्हा एक कोरोना बाधित झाला कोरोना मुक्त : जिल्ह्यात आता एक अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील चौदा दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असल्याने आत्तापर्यंत एकूण ६८ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता एक कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून त्या रुग्णाला सुध्दा बुधवारी (दि.१०) सुटी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हा आता पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर असल्याने जिल्हावासीयांसाठी ही निश्चितच दिलासादायक आणि आनंदाची बाब आहे.येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये मंगळवारपर्यंत (दि.९) दोन कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. मात्र यापैकी एक कोरोना बाधित मंगळवारी कोरोनामुक्त झाल्याने त्याला कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली. त्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये आता एकच कोरोना बाधित रुग्ण दाखल असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.या रुग्णाला सुध्दा बुधवारी सुटी देण्यात येणार असल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. तब्बल ३९ दिवस ग्रीन झोनमध्ये असलेल्या गोंदिया जिल्ह्यात १९ मे रोजी मुंबई आणि पुण्याहून आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाचा शिरकाव झाला.त्यामुळेच आठवडाभरातच जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ६९ वर पोहचल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण होते.शिवाय हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील असल्याने ग्रामीण भागात कोरोनाचे हॉटस्पॉट तयार होत असल्याचे चित्र होत. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने वेळीच उपाययोजना केल्याने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यास यश आले आहे.विशेष कोरोना बाधित रुग्ण हे उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याने आतापर्यंत एकूण ६८ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना कोविड केअर सेंटरमधून सुटी देखील देण्यात आली. आता कोविड केअर सेंटरमध्ये एकच कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू आहे. तो सुध्दा उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहे. त्यामुळे हा रुग्ण देखील लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता असल्याने गोंदिया जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी आनंदाची बातमी आहे.क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांची संख्या होतोय कमीकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे, कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आणि रेडझोनमधून आलेल्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करुन ठेवले जात आहे. संस्थामत्क क्वारंटाईन सेंटरमध्ये सध्या स्थितीत १९४७ नागरिकांना ठेवण्यात आले आहे. यापैकी बऱ्याच जणांना बुधवारी सुटी देण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.नियमित स्वॅब नमुने तपासणी सुरूयेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे.या प्रयोगशाळेचे सोमवारी (दि.८) पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यानंतर मंगळवारपासून या प्रयोगशाळेत कोरोना संसर्गाच्या स्वॅब नमुने तपासण्यास सुरूवात करण्यात आली. मंगळवारी ७ स्वॅब नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या