जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST2020-06-10T05:00:00+5:302020-06-10T05:00:30+5:30

या रुग्णाला सुध्दा बुधवारी सुटी देण्यात येणार असल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. तब्बल ३९ दिवस ग्रीन झोनमध्ये असलेल्या गोंदिया जिल्ह्यात १९ मे रोजी मुंबई आणि पुण्याहून आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाचा शिरकाव झाला.त्यामुळेच आठवडाभरातच जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ६९ वर पोहचल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण होते.

The district is on the verge of becoming corona-free | जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर

जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर

ठळक मुद्देपुन्हा एक कोरोना बाधित झाला कोरोना मुक्त : जिल्ह्यात आता एक अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील चौदा दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असल्याने आत्तापर्यंत एकूण ६८ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता एक कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून त्या रुग्णाला सुध्दा बुधवारी (दि.१०) सुटी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हा आता पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर असल्याने जिल्हावासीयांसाठी ही निश्चितच दिलासादायक आणि आनंदाची बाब आहे.
येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये मंगळवारपर्यंत (दि.९) दोन कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. मात्र यापैकी एक कोरोना बाधित मंगळवारी कोरोनामुक्त झाल्याने त्याला कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली. त्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये आता एकच कोरोना बाधित रुग्ण दाखल असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
या रुग्णाला सुध्दा बुधवारी सुटी देण्यात येणार असल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. तब्बल ३९ दिवस ग्रीन झोनमध्ये असलेल्या गोंदिया जिल्ह्यात १९ मे रोजी मुंबई आणि पुण्याहून आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाचा शिरकाव झाला.त्यामुळेच आठवडाभरातच जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ६९ वर पोहचल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण होते.शिवाय हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील असल्याने ग्रामीण भागात कोरोनाचे हॉटस्पॉट तयार होत असल्याचे चित्र होत. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने वेळीच उपाययोजना केल्याने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यास यश आले आहे.
विशेष कोरोना बाधित रुग्ण हे उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याने आतापर्यंत एकूण ६८ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना कोविड केअर सेंटरमधून सुटी देखील देण्यात आली. आता कोविड केअर सेंटरमध्ये एकच कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू आहे. तो सुध्दा उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहे. त्यामुळे हा रुग्ण देखील लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता असल्याने गोंदिया जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी आनंदाची बातमी आहे.

क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांची संख्या होतोय कमी
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे, कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आणि रेडझोनमधून आलेल्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करुन ठेवले जात आहे. संस्थामत्क क्वारंटाईन सेंटरमध्ये सध्या स्थितीत १९४७ नागरिकांना ठेवण्यात आले आहे. यापैकी बऱ्याच जणांना बुधवारी सुटी देण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नियमित स्वॅब नमुने तपासणी सुरू
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे.या प्रयोगशाळेचे सोमवारी (दि.८) पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यानंतर मंगळवारपासून या प्रयोगशाळेत कोरोना संसर्गाच्या स्वॅब नमुने तपासण्यास सुरूवात करण्यात आली. मंगळवारी ७ स्वॅब नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली.

Web Title: The district is on the verge of becoming corona-free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.