पॉझिटिव्ह प्रयत्नांमुळे २० दिवसांपासून जिल्हा कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:00 IST2020-05-01T05:00:00+5:302020-05-01T05:00:33+5:30
२६ मार्च रोजी जिल्ह्यात पहिला कोरोना रु ग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्यातून केलेल्या उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला नाही. तर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आढळलेला पहिला रुग्णही आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे.

पॉझिटिव्ह प्रयत्नांमुळे २० दिवसांपासून जिल्हा कोरोनामुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील नागरिकांचे सहकार्य, कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि जिल्हावासीयांनी कोरोनाला हरविण्याच्या केलेल्या संकल्पामुळेच जिल्ह्यात मागील २० दिवसांत कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी करण्यात येणाऱ्या पॉझिटिव्ह उपाययोजनांमुळेच जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यास मदत होत आहे.
२६ मार्च रोजी जिल्ह्यात पहिला कोरोना रु ग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्यातून केलेल्या उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला नाही. तर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आढळलेला पहिला रुग्णही आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडीही लक्षणे दिसताच अशा व्यक्तींना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करु न त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण २३१ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी २१६ व्यक्तींच्या घशातील स्त्रावांच्या नमुन्यांचा चाचणी अहवाल प्राप्त झाला आहे. यातील २१६ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले असून १५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. मागील २० दिवसांच्या कालावधी जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रु ग्ण आढळला नसून जिल्हा कोरोनामुक्त आहे. कोरोना प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना केल्या जात आहे.
सहा क्वारंटाईन कक्षात ४६ जण
जिल्ह्यातील सहा शासकीय क्वारंटाईन कक्षात ४६ जणांवर सध्या उपचार सुरू आहे. यामध्ये जिल्हा क्र ीडा संकुल येथे २०, ग्राम चांदोरी येथे १३, ग्राम येगाव येथे एक, तिरोडा येथील नगर परिषद लिटिल बर्ड कॉन्व्हेंट येथे पाच, ग्राम घटेगाव येथे चार तर बिरसी उपकेंद्र येथे तीन अशा एकूण ४६ व्यक्तींचा समावेश आहे.