कचरा जाळून लावली जाते विल्हेवाट
By Admin | Updated: January 25, 2015 23:17 IST2015-01-25T23:17:12+5:302015-01-25T23:17:12+5:30
शहर कचऱ्याने माखलेले आहे. कचरा उचलून न्यावा तेवढाच वाढत चालला आहे. यावर सफाई कामगारांनी शॉर्टकट उपाय शोधून काढला आहे. तो म्हणजे कचरा जागेवरच जाळून त्याची

कचरा जाळून लावली जाते विल्हेवाट
गोंदिया : शहर कचऱ्याने माखलेले आहे. कचरा उचलून न्यावा तेवढाच वाढत चालला आहे. यावर सफाई कामगारांनी शॉर्टकट उपाय शोधून काढला आहे. तो म्हणजे कचरा जागेवरच जाळून त्याची विल्हेवाट लावण्याचा. येथील बीजीडब्ल्यु रूग्णालयासमोर रविवारी (दि.२५) हा प्रकार दिसून आला. यातून कचरा जळून खाक होत असला तरी त्यातून निघणाऱ्या धुरामुळे मात्र वातावरणात प्रदूषण होत आहे.
स्वच्छतेच्या मुद्याला घेऊन नगर परिषद नेहमीच चर्चेत राहते. वास्तवीक शहराला कचऱ्याने विळखा घातला आहे यात काही दुमत नाही. बघावे तेथे कचऱ्याचे ढिगार नजरेत पडतात. सफाई कामगारांकडून कचऱ्याची उचल करण्यात आली की लगेच तेवढाच कचरा पुन्हा दिसून येतो. एकंदर कचऱ्याची समस्या ही नेहमीचीच झाली आहे. येथील बीजीडब्ल्यु रूग्णालयासमोर मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे. त्यामुळे या मार्गावर ये-जा करताना दुर्गंधीचाही सामना करावा लागतो.
रविवारी (दि.२५) सफाई कामगारांकडून येथील कचऱ्याची उचल केली जात होती. यासाठी ट्रॅक्टर लावण्यात आला होता. मात्र कचऱ्याची उचल कमी केली जात असून कागमार कचरा तेथेच जाळत असल्याचे दिसून आले. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा हा शॉर्टकट मार्ग कामगारांनी शोधून काढल्याचे दिसले. विशेष म्हणजे हा प्रकार नवा नाही. हा प्रकार केला जात असताना कचरा नष्ट होतो. मात्र त्यातून निघणारा धूर वातावरण व मानवी आरोग्यासाठी हानीकारक असतो. अशात हा कितपत योग्य आहे हे सांगणे कठीण आहे. (शहर प्रतिनिधी)