उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:00 IST2020-06-05T05:00:00+5:302020-06-05T05:00:36+5:30

शहरात २८ मे रोजी एक रूग्ण मिळाला. यावर प्रशासनाने २९ मे ला शहरातील जुनी वस्तीला प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केले. मात्र उपविभागीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या पत्रानुसार हद्द सील करण्यात आली नाही. असा प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांचा आरोप आहे. उपविभागीय अधिकारी तिरोडा यांनी प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत केल्यावर स्थानिक प्रशासनाने जुनी वस्तीला सीमांकणानुसार बंद केले.

Disobey the order of the Sub-Divisional Officer | उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाला खो

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाला खो

ठळक मुद्देन.प.च्या सीमांकनात त्रुट्या : माजी नगराध्यक्षांची नाराजी, जिल्हाधिकारी घेणार का दखल

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : शहरात एक कोरोनाचा रूग्ण मिळाल्याने कन्टेंन्मेन्ट क्षेत्रातील नागरिकांना मरण यातना भोगावे लागत आहे. नगर पंचायतच्या हिटलरशाहीने बहुतेक नागरिकांवर दंड आकारले जात आहे. यातील काही दंड कायद्यानुसार होत असले तरी काही दंड सुडभावनेतून होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
शहरात २८ मे रोजी एक रूग्ण मिळाला. यावर प्रशासनाने २९ मे ला शहरातील जुनी वस्तीला प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केले. मात्र उपविभागीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या पत्रानुसार हद्द सील करण्यात आली नाही. असा प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांचा आरोप आहे. उपविभागीय अधिकारी तिरोडा यांनी प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत केल्यावर स्थानिक प्रशासनाने जुनी वस्तीला सीमांकणानुसार बंद केले. पण यात त्रुट्या असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे ओमप्रकाश ठाकूर व भुवन ठाकूर या दोन शेतकºयांनी दोन टॅक्टरद्वारे धान आणले होते. १ जून रोजी सायंकाळी अचानक पाऊस आल्यावर दोघेही शेतकरी २ जून रोजी शेतमालावर ताडपत्री झाकण्यासाठी घराशेजारी गेले.
सदर बाब प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दोन्ही शेतकऱ्यांना बोलावून प्रत्येकी पाच हजार दंड भरण्यास सांगितले. विशेष म्हणजे उपविभागीय अधिकारी तिरोडा यांच्या आदेशानुसार ज्या जागेवर त्या दोन शेतकऱ्यांचे धान भरलेले ट्रॅक्टर उभे होते ते कंटेन्मेंट झोनचा भाग नसल्याने त्यांच्यावर कारवाई कशी करण्यात आली. याविषयी वेगवेगळे तर्क लावले जात आहे. त्यामुळे ही कारवाई सुडभावनेतून तर कारवाई करण्यात आली नसावी अशी चर्चा आहे.

पोलिसांची सुरक्षा व्यवस्था तरी दहशत
एकीकडे नगर पंचायतच्या हिटलरशाहीने सारेच त्रस्त असताना त्या विरोधात आवाज उठविण्यासाठी कुणीही समोर येत नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र झटत आहे. मात्र स्थानिक प्रशासनाला याविषयी े काही घेणे देणे नाही. सध्या गोरेगाव नगर पंचायतच्या विरोधात सर्व सामान्यांचा आक्र ोश पहायला मिळत आहे.
कारवाई थांबवा- सीमा कटरे
येथील शेतकरी ओमप्रकाश ठाकूर व भुवन ठाकूर यांनी आपल्या शेतातील रब्बीचे धान घराशेजारी ठेवले होते.पाऊस आल्यावर दोन्ही शेतकऱ्यांनी धान भिजले तर नाही याची पाहणी केली. मात्र नगर पंचायत प्रशासनाने दोन्ही शेतकऱ्यांवर दंड आकारले.याविषयी गोरेगाव नगर पंचायतच्या माजी नगराध्यक्ष सीमा कटरे यांनी तहसीलदार गोरेगाव यांना निवेदन देऊन सदर कारवाई चुकीची असल्याचे सांगितले.

Web Title: Disobey the order of the Sub-Divisional Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.