शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

विकास कामात होतो भेदभाव

By admin | Updated: February 9, 2015 23:16 IST

प्रभाग क्रमांक १ मधील उर्वरित भागात येणाऱ्या कन्हारटोली, पूणाटोली व न्यू लक्ष्मीनगर परिसरातील नागरिक नगरसेवकांनी केलेल्या विकासकामांबाबत अनभिज्ञ आहेत. कित्येकांनी

कपिल केकत - गोंदिया प्रभाग क्रमांक १ मधील उर्वरित भागात येणाऱ्या कन्हारटोली, पूणाटोली व न्यू लक्ष्मीनगर परिसरातील नागरिक नगरसेवकांनी केलेल्या विकासकामांबाबत अनभिज्ञ आहेत. कित्येकांनी तर नगरसेवक दिसतच नसल्याचे सांगितले, तर काहींनी नगरसेवकांनी केवळ स्वत:च्या घराशेजारील परिसराचाच विकास केल्याचेही बोलून दाखविले. नगरसेवक ज्या परिसरात राहतात त्या भागातच कामे झाली असून अन्य परिसरासाठी त्यांच्याकडे वेळच नसल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले. नगरसेवकांच्या कारभाराशी संतुष्ट नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. येथील परिस्थिती बघता त्यांच्या बोलण्यात वास्तवीकता दिसून आली. परिसरात कामे झाली नाहीत असे म्हणता येणार नाही. मात्र जेवढी कामे करायला पाहिजेत त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. बांधकाम झाले नाही समजता येते. मात्र सफाईचा मुद्दा येथे गंभीर असून नागरिकांत सफाईला घेऊन चांगलाच रोष खदखदत आहे. अवाढव्य प्रभाग तयार झाल्याने नगरसेवकांनी आपले क्षेत्र वाटून घेतले असल्याचे येथे कानी पडले. क्षेत्र तर वाटण्यात आले मात्र आपल्या क्षेत्राची जबाबदारी पेलण्यात नगरसेवक कुचकामी पडत असल्याचेही चित्र परिसराचा फेरफटका मारला असता दिसले. परिसरात नगरसेवक काम करीत नाही असे बोलता येणार नाही. मात्र कामांच गरज आहे तेथे ते पोहचत नाही. लोकांच्या ऐकून घ्यायला त्यांना वेळच नसल्याचे नागरिक बोलत आहेत. पूणाटोली परिसरात पक्या नाल्यांची स्थिती कच्या नाल्यांपेक्षाही गचाळ आहे. कचरा नाल्यांत पडून आहे मात्र त्याची सफाई करणार कोण. नगरसेवक आपली कामे एकमेकांवर ढकलत असल्याचे कन्हारटोलीतील नागरिकांनी बोलून दाखविले. येथील परिसराची पाहणी केली असता रस्ते पूर्ण खराब झाले आहेत. त्यामुळे धूळीचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील प्लॉट्स कचरापेटीत परिवर्तीत झाले आहेत. सफाईची समस्या आहे ती आहेच. नाल्या सफाई अभावी दुर्गंधी पसरवीत आहेत. पथदिवे आठ दिवस जळतात व त्यानंतर अंधारासोबतच निभवावे लागते असे चित्र आहे. परिसराची परिस्थिती बघता नुकताच हा परिसर नगरपरिषदेने आपल्या हद्दीत घेतला असे वाटते. नगरसेवकांना समस्या सांगावी तर ते ऐकून घेतात व नंतर विसरून जात असल्याचे येथील नागरिक म्हणतात. सफाई म्हटली तर आपली आपल्याचा करावी लागते. अशात पालिका व निवडून दिलेले नगरसेवक मग काय कामाचे असेही बोलले जाते. विशेष म्हणजे नगरसेवक कामांत भेदभाव करतात हा ज्वलंत मुद्दा येथे कानी पडला. नगरसेवक ज्या भागात राहतात त्या भागातच कामे व सफाई होते. आमच्या परिसरात कुणी नसल्याने आम्हाला उघड्यावर टाकण्यात आल्याचे येथील महिला-पुरूषांनी बोलून दाखविले. किमान नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तरी ढुंकून बघण्याची अपेक्षाही येथील नागरिकांनी व्यक्त केली.