शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटाने केला महिलांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2016 01:52 IST

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने जे पाऊल उचलले ते योग्य आहे. महिला बचत गटामुळे

इंदोरा-बु. : महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने जे पाऊल उचलले ते योग्य आहे. महिला बचत गटामुळे महिलांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. बचत गटाच्या मदतीने महिलांनी आमूलाग्र प्रगती केल्याचे तिरोडा तालुक्यात उदाहरण आहे.सन १८४८ च्या काळात महात्मा जोतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. भ्रूणहत्या, सतीची प्रथा, बंद झाली पती मेल्यावर पत्नीचे डोक्यावरील केस कापून तिला कुरूप बनविल्या जात असे. स्त्रीने चूल व मूलच सांभाळावे असे असताना यंत्रयुगाच्या काळात महिला सक्षम झाली आहे. सावित्रीच्या लेकी आता स्वत:चा विकास स्वत: करू शकतात. त्यांना साथ हवी आहे. शासनाच्या विविध योजनांतून स्त्रियांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांनी पडद्यांच्या आत न राहता समोर यावे म्हणून विविध प्रकारच्या योजना, प्रशिक्षण दिले. परंतु आजही स्त्रियांचा पाहिजे तेवढा विकास होऊ शकला नाही. बचत गटाच्या माध्यमातून विकास व्हावा म्हणून पुरूष गट स्थापन केले. त्या गटांना सबसिडीवर उद्योग धंदे करण्यासाठी कर्ज देण्यात आले पण सबसिडी घेण्याचा नादात बचत गटाच्या सदस्यांवर कर्ज झाले. पण शासनाने तीन वर्षापासून महिला विकास महामंडळ व नाबार्डच्या माध्यमातून महिला बचत गटाला कर्ज देण्याची योजना आखली. ही योजना महिला बचत गटांना अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरली. या एजन्सीने सुरूवातीपासूनच नियमामुळे कामात पारदर्शकता ठेवली. बचत गट स्थापन करणे, त्याचे रजिस्टर वेळेवर तयार करणे, तपासणी करणे बँकेचे विविध कामे महिलांकडून करून घेणे, यामुळे तालुक्यात महिला विकास महामंडळाला बचत गट जुळले आहेत. बचत गटाचा रेकार्ड पारदर्शिका असतो, प्रत्येक महिलांना बँकेत जाण्याची संधी मिळते. त्यामुळे महिलांनी कर्ज घेणे कर्जाची परतफेड करणे, बँकेचा व्यवहार यांचा अनुभव यामुळे महिलांना आला आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम होत आहेत. महिलांच्या पुढाकाराने गावातील १०० टक्यांनी कर्ज देणारे सावकार हे रस्त्यावर आले व पतसंस्थांची लुटमार थांबली. मविमनने गावागावातील महिलांना जोडण्यासाठी विविध स्पर्धात्मक खेळाचे आयोजन केले. बचत गटामुळे महिलांचे मनातील भीती कायमची निघाली. बँकेत व इतर ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांकडून कार्यालयीन कामे करवून घेतात. (वार्ताहर)