शिक्षणाशिवाय विकास शक्य नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST2020-02-04T05:00:00+5:302020-02-04T05:00:27+5:30
शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे म्हटले जाते. शिक्षणामुळे माणसाला त्याचे अधिकार व जवाबदाऱ्यांची जाणीव होते. यातूनच माणसाचा विकास होतो.

शिक्षणाशिवाय विकास शक्य नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे म्हटले जाते. शिक्षणामुळे माणसाला त्याचे अधिकार व जवाबदाऱ्यांची जाणीव होते. यातूनच माणसाचा विकास होतो. यामुळे विद्यार्थिनींनी विकासाकरिता परिश्रम करावे. शिक्षणाशिवाय आपला विकास शक्य नाही असे प्रतिपादन प्राचार्य रीता खोब्रागडे यांनी केले.
येथील आदिवासी शैक्षणिक संशोधन संस्था द्वारा संचालित एस. चंद्रा महिला महाविद्यालयाच्यावतीने आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सव व सांस्कृतीक कार्यक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
क्रीडा महोत्सव प्रमुख प्रा. डॉ. अजय मुन यांच्या नेतृत्वात विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्यात तसेच सांस्कृतीक कार्यक्रम प्रा.भावना खापर्डे व प्रा. देवानंद खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात पार पडले.
याप्रसंगी प्राचार्या डॉ.तृष्णा कळंबे यांनी प्रास्ताविक भाषणातून महाविद्यालयाचा इतिहास सादर केला. याप्रसंगी प्रा. डॉ. प्रमोद सरदार यांनी शिक्षणासोबतच कलेचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगितले.
याप्रसंगी धावण्याच्या स्पर्धेत प्रथम खुषाली लांजेवार, द्वितीय दुर्गा हटोले, रांगोळी स्पर्धेत प्रथम करिष्मा चोरवाडे, द्वितीय आरजू शहारे, तृतीय रत्नशीला रहांगडाले, पुष्प सजावट स्पर्धेत प्रथम पौर्णिमा गायधने, द्वितीय यशोदा हेमणे, तृतीय पूजा बारापात्रे, डिश डेकोरेशन स्पर्धेत प्रथम पूजा डोये, द्वितीय खुषाली लांजेवार, तृतीय पूजा बारापात्रे, फॅन्सी ड्रेस स्पर्धेत प्रथम कनक राऊत, द्वितीय पूजा डोये तर गु्रपमध्ये प्रथम वैष्णवी बडोले व शितल नांदगाये, नृत्य स्पर्धेत यशोदा हेमणे यांच्या चमुला प्रथम पारितोषीक प्राप्त झाले. गीत गायन स्पर्धेत प्रथम कनक राऊत, द्वितीय पूनम वाढीवे तर तृतीय क्रमांक आषा कुरंजेकर हिने पटकाविला. ‘उमंग’-२०२० ची उत्कृष्ट खेळाडू म्हणून खुषाली लांजेवार हिला गौरविण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजय संभाजी लांजेवार यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धांची गरज असल्याचे सांगितले.कार्यक्रमासाठी प्रा. स्वप्नील भगत, प्रा.डॉ. ललीत कुमार ठाकुर, प्रा. कमलेश पाटील, प्रा. दिक्षा बडोले, प्रा. सुप्रिया गजभिये, प्रा. नितेश मेश्राम, प्रा. अविनाश कोसरे, मंगल गोंडाणे, हेमकृष्ण कठाणे, जयेश शहारे, राजेश हातझाडे, वर्षा वांढरे, थानसिंग ठाकुर, अमर गोडसे,राहूल मेश्राम, तेजरााम कापगते, निर्दोष शहारे यांनी केले.