शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

केशोरी परिसराचा विकास करणार

By admin | Updated: January 29, 2015 23:09 IST

या परिसरातील शेतकऱ्यांना सुजलाम-सुफलाम बनविण्यासाठी उपासीनाला प्रकल्पाच्या निर्मितीकडे विशेष लक्ष देवू. केशोरी परिसराचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,

पालकमंत्र्यांची ग्वाही : भाजप सदस्य नोंदणी अभियानांतर्गत कार्यकर्ता मेळावाकेशोरी : या परिसरातील शेतकऱ्यांना सुजलाम-सुफलाम बनविण्यासाठी उपासीनाला प्रकल्पाच्या निर्मितीकडे विशेष लक्ष देवू. केशोरी परिसराचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असा विश्वास सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला. भाजप सदस्य नोंदणी अभियानांतर्गत कार्यकर्ता मेळावा व भाजप केशोरीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.ना. बडोले पुढे म्हणाले, आदिवासीबहुल असलेल्या वारव्ही, गार्डनपूर, अंभोरा, चिसटोला या गावांतील तलावांच्या खोलीकरणासह मालगुजारी तलावांची कामे करून या भागातील शेती सिंचन व्यवस्था वाढविण्याचा प्रयत्न करू. तसेच या भागातून वाहणाऱ्या गाढवी नदीवर साखळी बंधारे तयार करून कायमस्वरूपी शेतीला पाणी पुरविण्याची व्यवस्था करून शेतकऱ्यांच्या धानाला प्रतिक्विंटल २ हजार ५०० रूपये भाव मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. आपण माझ्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे या भागाचा विकास करण्यास मी कटिबद्ध आहे, अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली.अध्यक्षस्थानी माजी आ. दयाराम कापगते होते. अतिथी म्हणून भाजप तालुकाध्यक्ष रघुनाथ लांजेवार, अर्थ व बांधकाम सभापती प्रकाश पाटील गहाणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काशिम जमा कुरैशी, पं.स. सभापती ताणेश ताराम, लक्ष्मीकांत धमगाये, केवळराम पुस्तोडे, ग्रा.पं. सदस्य नंदकुमार पाटील गहाणे, दयाराम शहारे, चंद्रशेखर टेंभुर्णे, हरिशचंद्र उईके, तेजुकला गहाणे, रामदास देशकर, माला हुमणे, प्रभा वासनिक उपस्थित होते.यावेळी नव्याने भाजप पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा ना. बडोले यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महिला स्मारक समितीतर्फे ओवाळणी घालून बडोले यांना शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. मात्र या कार्यक्रमात मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शाखा केशोरीच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले. नंदू पाटील गहाणे यांनी परिसरातील समस्या व शेतकऱ्यांच्या व्यथा आपल्या प्रास्ताविकातून ना. बडोले यांच्याकडे मांडल्या. संचालन देवा शेंडे यांनी तर आभार ताणेश ताराम यांनी मानले. कार्यक्रमासाठी विलास बोरकर, विजय गहाणे, परमानंद गहाणे, भाऊराव गहाणे, ओमप्रकाश गहाणे, अशोक देशकर व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)