शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
5
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
6
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
10
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
11
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
12
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
13
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
14
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
15
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
16
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
17
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
18
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
19
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
20
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...

मुसळधार पावसानंतरही तूट कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 6:00 AM

ऑगस्ट महिन्यातील दमदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प तसेच नदी-नाल्यांना पाणी आले. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यातील पावसाने कहर केला असून मागील कित्येक वर्षांनंतर जिल्ह्यात पुराचा वेढा दिसला. सप्टेंबर महिन्यातील आतापर्यंतच्या या १० दिवसांत पावसाने जिल्ह्याला पार झोडपून काढले असून सर्वत्र पाणी-पाणी केले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याला पुराचा वेढा : तरीही १९५ मिमीची तूट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील पंधरवड्यापासून जिल्ह्याला पावसाने पार झोडपून काढले आहे. आजही जिल्ह्यात दमदार पाऊस बरसत असून पुराने वेढा घातला आहे. मागील कित्येक वर्षांनंतर हे चित्र बघावयास मिळत आहे. मात्र असे असतानाही आजही सरासरी १९५ मिमी पावसाची तूट कायम आहे. पावसाने कहर क रून सोडला असताना आता उरलेल्या २० दिवसांत मात्र ही तूट भरते काय याकडे लक्ष लागले आहे.सुरूवातीच्या जून व जुलै महिन्यात पावसाने पाहिजे त्या प्रमाणात आपली हजेरी लावली नाही. परिणामी तेव्हापासूनच जिल्ह्यातील अपेक्षित व बरसलेल्या पावसात तूट दिसून आली. जून महिना कोरडाच गेला त्यानंतर जुलै महिन्यात काही पाऊस बरसला व तेव्हापासूनच हा फरक वाढू लागला.अशात आॅगस्ट महिन्यात वरूणराज जिल्ह्यावर मेहरबान झाले.याच महिन्यात जिल्हा सावरला.दमदार पावसाच्या हजेरीने शेतीची कामे उशीरा का होईना मात्र कशीतरी आटोपली. ऑगस्ट महिन्यातील दमदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प तसेच नदी-नाल्यांना पाणी आले. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यातील पावसाने कहर केला असून मागील कित्येक वर्षांनंतर जिल्ह्यात पुराचा वेढा दिसला. सप्टेंबर महिन्यातील आतापर्यंतच्या या १० दिवसांत पावसाने जिल्ह्याला पार झोडपून काढले असून सर्वत्र पाणी-पाणी केले आहे. असे असताना मात्र आजही अपेक्षित व बरसलेल्या पावसात सरासरी १९५ मिमी तूट दिसून येत आहे.जिल्ह्यात ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११७५ मिमी पाऊस बरसने अपेक्षित आहे. असे असताना मात्र जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९७७ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. म्हणजेच, आजही सरासरी १९५ मिमी पावसाची तूट कायम आहे.मागील वर्षी ९ सप्टेंबरपर्यंत सरासरी १०४५ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली होती.२० दिवसांत सरासरी ३५० मिमीची गरजहवामान खात्यानुसार,जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत सरासरी १३२७ मिमी पाऊस बरसने अपेक्षित आहे. तर आतापर्यंत सरासरी ९७७ मीमी पाऊस बरसला आहे. आता पावसाचे २० दिवस शिल्लक असून यात कालावधीत सरासरी ३५० मिमी पावसाची गरज आहे.सध्या बरसत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात ३५० मिमीचे टार्गेट सर करण्यासाठी पाऊस बरसल्यास काय स्थिती राहणार याची कल्पना न केलेलीच बरी.

टॅग्स :floodपूरwater shortageपाणीकपात