शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जवसुली स्थगितीतून जिल्ह्याला डच्चू

By admin | Updated: March 14, 2016 01:53 IST

जिल्ह्यातील १०९ गावांची पीक पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला ३१ डिसेंबर २०१५ रोजी पाठविला.

शासनाचा तुघलकी निर्णय : परशुरामकर यांचा आरोपगोंदिया : जिल्ह्यातील १०९ गावांची पीक पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला ३१ डिसेंबर २०१५ रोजी पाठविला. परंतु राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ११ मार्च रोजी सन २०१५-१६ च्या खरीप व रबी हंगामात हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये सहकारी कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यासंबंधीचा जो आदेश काढला. त्यात गोंदिया जिल्ह्यातील सर्व गावांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांचे सरकार करीत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केला आहे. जिल्ह्यात एकूण ९५५ गावे असून पिक नसलेली ३४ गावे आहेत. उर्वरीत ९२१ गावांत सुमारे एक लक्ष ८८ हजार २६२ हेक्टर जमिनीवर धानाचे पिक घेतल्या गेले. जिल्हा प्रशासनाने हंगामी पैसेवारी काढताना देवरी तालुक्यातील फक्त ४४ गावांमधील पैसेवारी ५० पैशांच्या आत दाखविली होती. परंतू संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ओरड केल्यानंतर सुधारित व अंतिम पैसेवारी काढताना गोरेगाव तालुक्यातील २३ गावे, देवरी तालुक्यातील ६८ गावे, सालेकसा तालुक्यातील १३ गावे, आमगाव तालुक्यातील ५ गावे अशा एकूण १०९ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या अत दाखविण्यात आली. तर उर्वरित ८१२ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या वर दाखविण्यात आली होती. सदर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी प्रधान सचिव (महसूल व वनविभाग) यांना ३१ डिसेंबर २०१५ रोजी सादर केला. परंतू शासनाने ११ मार्च २०१६ ला सन २०१५-१६ च्या खरीप व रबी हंगामात हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या गावात सहकारी कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबतचा सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाने जो आदेश काढला त्यात गोंदिया जिल्ह्यातील एकही गाव ५० पैशांच्या अत दाखविण्यात आलेला नाही. त्यामुळे या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असतानासुद्धा शासनाच्या या योजनेचा लाभ एकाही गावाला मिळू नये हा प्रकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा आहे. त्यामुळे सरकारच येथील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे, असा आरोप परशुरामकर यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना थाटामाटात सुरू केल्याचे जाहीर केले. पूर्वीच्या सरकारने या आकाराच्या शेततळ््याला ८७ हजार रूपयांचे अनुदान दिले जात होते. या सरकारने हे अनुदान ५० हजार रूपयांवर आणले असून ज्या गावांची पीक पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे त्याच गावांना या योजनेचा फायदा लाभ मिळेल असे जाहीर केले आहे. जिल्ह्यातील एकाही गावाची पैसेवारी ५० पैशांच्या आत नसल्याने या योजनेचा फायदाही या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेता येणार नाही, असा आरोपही परशुरामकर यांनी केला आहे.