जिल्ह्यात मृतांची संख्या वाढतीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 05:00 IST2020-10-25T05:00:00+5:302020-10-25T05:00:08+5:30
बघता-बघता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १० हजारांच्या घरात जात आहे. रूग्ण संख्या वाढत असतानाच त्या सोबतच मृतांची संख्या वाढत असून ११७ पर्यंत पोहचली आहे. ही बाब चिंताजनक असून सर्वांचेच टेन्शन वाढविणारी आहे. जिल्हा प्रशासनानुसार कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८६.१७ एवढे आहे. ही बाब जिल्हावासीयांना दिलासा देणारी असली ततरिही १.२३ टक्के मृत्यूदर नोंदविण्यात आला असून त्यानुसार, मृतांची वाढती आकडेवारी ही बाब मात्र तेवढीच चिंताजनक आहे.

जिल्ह्यात मृतांची संख्या वाढतीच
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना पुन्हा बळावत असल्याचे दिसत असून यासोबतच मृतांची संख्याही वाढत जात असल्याने ही बाब टेन्शन देणारी ठरत आहे. महिन्यात मृतांची संख्यी जमी कमी वाटत असली तरी आतापर्यंत २० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातही आता मागील ४-५ दिवसांपासून दररोज रूग्णांचा मृत्यू होत असल्याने जिल्हावासी पुन्हा दहशतीत आले आहेत.
बघता-बघता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १० हजारांच्या घरात जात आहे. रूग्ण संख्या वाढत असतानाच त्या सोबतच मृतांची संख्या वाढत असून ११७ पर्यंत पोहचली आहे. ही बाब चिंताजनक असून सर्वांचेच टेन्शन वाढविणारी आहे. जिल्हा प्रशासनानुसार कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८६.१७ एवढे आहे. ही बाब जिल्हावासीयांना दिलासा देणारी असली ततरिही १.२३ टक्के मृत्यूदर नोंदविण्यात आला असून त्यानुसार, मृतांची वाढती आकडेवारी ही बाब मात्र तेवढीच चिंताजनक आहे.
ऑक्टोबर महिन्यात मृतांची संख्या कमी दिसत असली तरिही आता पर्यंत २० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातच मध्यंतरी मृत्यूची नोंद होत नसल्याने जिल्हावासीयांना थोडाफार दिलासा मिळाला होता.
मात्र आता मागील ४-५ दिवसांपासून पुन्हा दररोज मृतांची नोंद होत असल्याने जिल्हावासीयांचे टेन्शन वाढले आहे. अशात मात्र कोरोना जिल्ह्यात पाय पुन्हा पसरत असल्याचे दिसत आहे.
गर्दी टाळणे अत्यधिक गरजेचे
लोकांचा एकमेकांशी येत असलेला संपर्क हाच कोरोना प्रसारासाठी पोषक आहे. सध्या नवरात्री सुरू असून कोरोनामुळे उत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे. यामुळे दरवर्षी होणारी गर्दी यंदा दिसून आली नाही. मात्र कमी प्रमाणात का असो ना गर्दी होत असून यामुळे कोरोना रूग्णांची कमी झालेली नोंद ही पुन्हा वाढू लागल्याचे दिसले. अशात नागरिकांनी गर्दी टाळणे अत्यधिक गरजेचे आहे.