वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 20:41 IST2019-04-13T20:40:36+5:302019-04-13T20:41:12+5:30
तिरोडा तालुक्यात शुक्रवारी (दि.१३) रात्री आलेल्या वादळी पावसामुळे फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून फळबागधारकांना रस्त्यावर येण्याची पाळी आली आहे.

वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
वडेगाव : तिरोडा तालुक्यात शुक्रवारी (दि.१३) रात्री आलेल्या वादळी पावसामुळे फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून फळबागधारकांना रस्त्यावर येण्याची पाळी आली आहे.
शुक्रवारी रात्री वडेगाव परिसरात वादळी वाºयासह पावसाला सुरूवात झाली. वादळामुळे आंबा तसेच इतर फळांच्या बांगाना मोठा फटका बसला. वादळामुळे फळांची पडझड झाल्याने शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास हिरावला गेला. साटोना येथील भोजराज पटले यांच्या गट क्र . ४५१ वरील बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांच्या दोन एकर शेतीतील बागायती शेतीत ६६ आंब्याची,चिकू, संत्रा व इतर पिके मिळून सुमारे ४६७ फळझाडे लावलेली आहेत.
आंब्याचे पीक ऐन जोमात येत असतानाच चक्र ीवादळामुळे सर्व आंबे तुटून पडले. यात पटले यांचे सुमारे ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले. अनेक झाडे मुळापासुनच कोलमडून पडली. यामुळे शेतकºयावर संकट ओढावले आहे. स्थनिक तलाठीे, कृषी सहायक प्रमोद डोहाळे यांनी फळबागांना भेट देऊन पंचनामा केला. तसेच याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला. याप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देऊन शासनाकडून मदत मिळण्यास पाठपुरावा करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी भोजराम पटले यांनी केली आहे.
परिसरात फळबागांची लागवड करून पीक घेणारे मोजकेच शेतकरी असल्याने या भागात फळबागांचा विमा काढत नाही.यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते.
- भोजराम पटले, नुकसानग्रस्त शेतकरी, वडेगाव.