टोळधाड आटोक्यात आल्याने संकट टळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:00 IST2020-06-18T05:00:00+5:302020-06-18T05:00:50+5:30
तिरोडा आणि गोंदिया तालुक्यात सर्वाधिक टोळधाडीचा प्रभाव दिसून आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. लगतच्या भंडारा जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण झाल्याने ती गोंदिया जिल्ह्यात केव्हाही दाखल होण्याची शक्यत लक्षात घेत कृषी विभागाने कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन सर्वेक्षण करण्यास सुरूवात केली होती.

टोळधाड आटोक्यात आल्याने संकट टळले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारा जिल्ह्यातून पाच सहा दिवसांपूर्वी गोंदिया जिल्ह्यात दाखल झालेल्या टोळधाडीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने याची वेळीच दखल घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि तीन गावांमध्ये फवारणी केल्याने जिल्ह्यातून टोळधाड आटोक्यात आली आहे. परिणामी खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर आलेले टोळधाडीचे संकट तूर्तास तरी टळले आहे.
जिल्ह्यातील शेतकरी सध्या खरीप हंगामातील पेरणी आणि मशागतीच्या कामात व्यस्त आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे.त्या शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले आहे. तर काही शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र पाच दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यातून टोळधाडीने गोंदिया जिल्ह्यात प्रवेश केला.
तिरोडा आणि गोंदिया तालुक्यात सर्वाधिक टोळधाडीचा प्रभाव दिसून आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. लगतच्या भंडारा जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण झाल्याने ती गोंदिया जिल्ह्यात केव्हाही दाखल होण्याची शक्यत लक्षात घेत कृषी विभागाने कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन सर्वेक्षण करण्यास सुरूवात केली होती.
तसेच टोळधाड जिल्ह्यात दाखल झाल्यास त्यावर वेळीच उपाययोजना करता याव्यात यासाठी किटकनाशक फवारणी आणि इतर उपाययोजना पूर्वीच करुन ठेवल्या होत्या. त्यामुळे टोळधाड तिरोडा आणि गोंदिया तालुक्यात दाखल झाल्यानंतर ड्रोनव्दारे झाडांवर किटकनाशकांची फवारणी करुन टोळधाडीला जिल्ह्यातून परतावून लावण्यात कृषी विभागाला यश आले आहे.सध्या स्थितीत टोळधाड जिल्ह्यातून पूर्णपणे आटोक्यात आली आहे.
टोळधाडीने मध्यप्रदेशाच्या दिशेने मार्गक्रमण केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील मोठे संकट टळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब आहे.
पऱ्ह्यांवरील संकट झाले दूर
जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्या शेतकऱ्यांनी खरिपासाठी धानाची पºहे टाकले होते. काही शेतकºयांच्या पºहांची चांगली वाढ सुध्दा झाली आहे.मात्र याच दरम्यान टोळधाडीने आक्रमण केल्याने या पऱ्ह्यांवर संकट निर्माण झाले होते. मात्र वेळीच करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि टोळधाडीने मध्यप्रदेशाच्या दिशेने मार्गक्रमण केल्याने धानाच्या पºहांवरील संकट टळले आहे.
जिल्ह्यातून टोळधाड आतापूर्ण आटोक्यात आली असून टोळधाडीच्या थव्यांनी मध्यप्रदेशाच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे. टोळधाडीचे पुन्हा आक्रमण झाल्यास वेळीच उपाययोजना करण्यासाठी कृषी विभाग सज्ज आहे.
- गणेश घोरपडे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.