शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनातून रोजगार निर्मिती

By admin | Updated: May 2, 2015 01:41 IST

नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या गोंदिया जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत.

गोंदिया : नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या गोंदिया जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटनस्थळांचा विकास करुन जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात यावेत आणि त्या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. शुक्रवारी (१ मे) महाराष्ट्र दिनाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय कारंजा येथील मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्रसंचालक संजय ठवरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, गोंदियाचे नगराध्यक्ष कशिश जायसवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री पुढे म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील वास्तव्याने पावन झालेल्या वास्तू खरेदीची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल. मुंबई येथील इंदू मिलच्या जागेवर डॉ.आंबेडकरांचे आंतराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचा संकल्प आमच्या सरकारने केला आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने जिल्ह्यातील ११८ रास्तभाव दुकाने महिला स्वयंसहायता बचत गटांना देण्यात आले आहे. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल असून आरोग्य सेवा देण्यास जिल्हा नागपूर मंडळात प्रथम असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. वनालगतच्या गावातील ७७२३ कुटुंबाना एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.प्रारंभी पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. पालकमंत्र्यांनी पोलीस, गृहरक्षक दल यांच्या परेडचे निरीक्षण केले. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी)