शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो मजुरीसाठी भाकपचे आंदोलन

By admin | Updated: May 24, 2014 23:44 IST

रोजगार हमी योजनेंतर्गत दासगाव खुर्द, लोहारा, पिपरटोला, मानुटोला, किन्ही, गिरोला, धिवारी, चंगेरा, काटी व इतर ठिकाणी कामे करण्यार्‍या मजुरांना फेब्रुवारी महिन्यापासून मजुरी न मिळाल्याने

गोंदिया : रोजगार हमी योजनेंतर्गत दासगाव खुर्द, लोहारा, पिपरटोला, मानुटोला, किन्ही, गिरोला, धिवारी, चंगेरा, काटी व इतर ठिकाणी कामे करण्यार्‍या मजुरांना फेब्रुवारी महिन्यापासून मजुरी न मिळाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या मजुरांना त्वरित मजुरी देणे, मजुरी वेळेवर न देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करणे तसेच इतर प्रश्नांना घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे २0 मे रोजी तालुक्यातील ग्राम दासगाव येथील बसस्थानक चौकातुन मोर्चा काढण्यात आला व राजस्व निरीक्षक कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान नायब तहसिलदार पाटील यांना निवेदन सादर करुन चर्चा करण्यात आली.

पक्षाचे तालुका सचिव रामचंद्र पाटील, वासुदेवराव ढोके, करुणा गणविर, तालुका सहसचिव प्रल्हाद उके यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात राज्य सचिव मंडळ सदस्य शिवकुमार गणविर, राज्य कार्यकारणी सदस्य हौसलाल रहांगडाले व मिलिंद गणवीर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी नायब तहसीलदार पाटील यांनी दोन मस्टरची मजुरी वाटप करण्यात आले असल्याचे सांगितले तसेच रायपूर येथे अवैध वसुली करणार्‍या अशासकीय व्यक्तीला त्वरित हटविण्यात येईल, ग्राम बलमाटोला येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानदारावर नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे, अतवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना बँकांमार्फत भरपाई त्वरित देण्याचे आश्‍वासन आंदोलनकर्त्यांंंना दिल्याने धरणे आंदोलन समाप्त करण्यात आले. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी पुरुषोत्तम मेश्राम, सोहन धामडे, प्रियंका ढोके, तुकाराम परसमोडे, पंधरे, ज्ञानीराम मेश्राम यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)