शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

गायी व म्हशी फक्त कालवडींनाच जन्म देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:00 IST

दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी जिल्ह्याचे भौगोलिक वातावरण अनुकूल आहे. जिल्ह्यात पशुपालकांची टक्केवारी वाढली आहे. सोबतच अदानी फाऊंडेशनने २ पशुधन विकास केंद्रांची पशुधन सेवा २६ गावांमध्ये कार्यरत आहे. या २६ गावांमध्ये ७०६० जनावरांपासून किमान प्रतिदिन १० हजार ७६ लिटर दुधाचे उत्पादन होते. यामुळेच दुग्ध उत्पादनात तिरोडा तालुका प्रगतीपथावर आहे.

ठळक मुद्देजनावरांचे कृत्रिम रेतन : अदानी फाऊंडेशनचा उपक्रम, दुग्ध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : अदानी फाऊंडेशनच्यावतीने पशुधन विकास, दुग्ध व्यवसाय आणि शाश्वत पशुधनावर आधारीत उदरनिर्वाहाचे उपक्रम सातत्याने राबविले जात आहे. यातंर्गत जनावरांचे कृत्रिम रेतन केले जात आहे. या तंत्रांतर्गत गायींमध्ये कालवडींना जन्म देण्याची ९० टक्के शाश्वती असते.दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी जिल्ह्याचे भौगोलिक वातावरण अनुकूल आहे. जिल्ह्यात पशुपालकांची टक्केवारी वाढली आहे. सोबतच अदानी फाऊंडेशनने २ पशुधन विकास केंद्रांची पशुधन सेवा २६ गावांमध्ये कार्यरत आहे. या २६ गावांमध्ये ७०६० जनावरांपासून किमान प्रतिदिन १० हजार ७६ लिटर दुधाचे उत्पादन होते. यामुळेच दुग्ध उत्पादनात तिरोडा तालुका प्रगतीपथावर आहे.दुग्ध व्यवसायासाठी कालवडीची उपयुक्तता ही खोंड बैलापेक्षा जास्त आहे. परंतु सद्यस्थितीत गावामध्ये नर व मादी वासराला जन्म देण्याचे प्रमाण ५०:५० आहे. जर खोड जन्मला तर त्याची उत्पादकता कमी होते व अनुत्पादक जनावर पशुपालकांवर ओझे बनलेले आहे. तसेच कालवडीची मागणी ही जास्त प्रमाणात दिसून येते.यासाठी अदानी फाऊंडेशनने जनावरांचे कृत्रिम रेतन करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये प्रक्रिया केलेल्या वीर्य कांड्यांचा वापर गाभण राहिलेल्या गायींमध्ये करतात. यात कालवडींना जन्म देण्याचे प्रमाण ९० टक्के असते व जे परंपरागत पद्धतीने केवळ ५० टक्के असते. या वीर्य कांड्यांचा वापर २००४ सालापासून अमेरिका व ब्राझील देशात होत आहे. फ्लो स्पाईटोमीटर नावाच्या साधानाने कृत्रिम रेतन केले जाते. याचा फायदा शेतकरी व पशुपालकांना होतो. त्यात कळपाची वाढ झपाट्याने होते व दूध उत्पादनात वाढ होते.उपलब्ध चाऱ्याचा किफायतशीर वापर, खोंड जन्माला येण्याचे प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे चाºयाचीही बचत होते. अदानी फाऊंडेशनने ही सेवा विनामुल्य प्रदान करीत आहे. बीएआयएफ ही अंमलबजावणी करणारी एजन्सी म्हणून गावात कार्यरत आहे. यावर्षी सन २०२०-२१ मध्ये २५६ रेतन करण्यात आले. तर एक हजार जनावरांचे रेतन करण्याचे लक्ष्य फाऊंडेशनने ठेवले आहे. या यशासोबतच जिल्ह्यात उत्पादक देशी गायींची प्रख्याती वाढविण्याचे उद्दिष्ट अदानी फाऊंडेशनने ठेवले आहे. फाऊंडेशनने स्थानिक गाई व म्हशींमध्ये उत्पादकता सुधारणा करुन शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे अतिरिक्त स्त्रोत म्हणून तिरोडा ब्लॉकमध्ये दुग्ध व्यवसाय विकास करण्याचा निर्धार केला आहे. पशुधन विकासासोबतच फाऊंडेशन दुग्ध व्यवसायावर आधारीत उपजिविका प्रशिक्षण कार्यक्रमही राबवित आहे. यामध्ये देवलापार येथील गौ-विज्ञान अनुसंधान केंद्रामार्फत ४६७ गायी व बैल मोफत देण्यात आले. सोबतच दोन हजार ५७३ शेतकºयांना सेंद्रिय किटकनाशके आणि जैव इंझाइम तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. दुग्ध विकास विकासासाठी चांगल्या प्रतिच्या ए-२ दुधाच्या उत्पादनासाठी देशी गायीच्या जातीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यानुसार एकूण ३० थारपारकर देशी गायी व बैल पुण्याहून अदानी फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रगतीशिल महिला शेतकरी उत्पादकांनी खरेदी केली.जिल्ह्यातील शेतकºयांना शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा पर्याय उपलब्ध करुन दिला जात आहे. त्यामुळे शेतकºयांना दुग्ध व्यवसायातून विकास साधने शक्य होत आहे.२ पशुधन विकास केंद्रांची स्थापनासन २०१७ मध्ये अदानी फाऊंडेशनने तिरोडा तालुक्यातील ग्राम खैरबोडी आणि कवलेवाडा येथे २ पशुधन विकास केंद्रांची (एलडीसी) स्थापना केली.ज्याचा फायदा जवळपासच्या २६ गावांना होत आहे. दोन्ही केंद्र पशुधन आरोग्य सेवा नि:शुल्क सेवा प्रदान करतात. ज्यात कृत्रिम रेतन गर्भधारणा, रोगनिदान, पशु आरोग्य तपासणी शिबिर, प्रशिक्षण, बियाणे वितरण व चार डेमा यो सेवांचा समावेश आहे. आतापर्यंत २५५४ एआय, २५६ एसएसएसएआय, २१८३ गर्भधारणा निदान आणि १६२२ गर्भधारणेची पुष्टी पूर्ण केलल्या आहे. एकूण परिणाम म्हणून ८७३ देशी जातीच्या वासरांचा यशस्वीरित्या गावांमध्ये जन्म झाला आहे.

टॅग्स :milkदूधcowगाय