तिरोडा तालुका पत्रकार संघातर्फे कोरोना योध्दयांचा सत्कार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:15 IST2021-01-13T05:15:34+5:302021-01-13T05:15:34+5:30

कार्यक्रमाचे उद्‌घाटन आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सुरेंद्र भांडारकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. ...

Corona Warriors felicitated by Tiroda Taluka Press Association () | तिरोडा तालुका पत्रकार संघातर्फे कोरोना योध्दयांचा सत्कार ()

तिरोडा तालुका पत्रकार संघातर्फे कोरोना योध्दयांचा सत्कार ()

कार्यक्रमाचे उद्‌घाटन आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सुरेंद्र भांडारकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. भजनदास वैद्य, माजी आ. दिलीप बन्सोड, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, नगरसेवक सुनील पालांदूरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चिंतामण रहांगडाले, माजी जिल्हा परिषद सभापती डॉ. योगेंद्र भगत, राजलक्ष्मी तुरकर, पंचम बिसेन, नरेश कुंभारे, डॉ. अविनाश जायस्वाल, तुमेश्वरी बघेले, तहसीलदार प्रशांत घोरूडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम, पोलीस निरीक्षक योगेश पारधी उपस्थित होते. कोरोना काळात विविध विभागातील ज्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कार्य केले अशा व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. याच कालावधीत तहसील कार्यालयात जबाबदारीने कर्तव्य पार पाडत असताना अव्वल कारकून सुरेश हुमणे, तलाठी रवींद्र मेश्राम व तलाठी परसराम मरस्कोल्हे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तिरोड्याचे तलाठी नरेश उगावकर यांचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला. कोविड सेंटरच्या माध्यमातून खासगी आरोग्यसेवा सुरु ठेवून रुग्णसेवा करणारे डॉ. संदीप मेश्राम, डॉ. चंद्रकिशोर पारधी, मुख्य परिचारिका शिप्रा खाडे, वडेगावचे आरोग्य सेवक मिलिंद ठमके, काचेवानी येथील आरोग्य सेवक एम.बी.बिसेन, नगर परिषदेचे कर्मचारी अंकुश खोब्रागडे, अभिमन्यू गुणेरिया, कुणाल लौंगबासे, नीतेश वाल्मीक, संतोष बोहणे, मुंडीकोटाचे सरपंच कमलेश आथिलकर, दीपक पुरुषलानी व त्यांच्या चमूचा उल्लेखनीय कार्याबद्दल पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला.

Web Title: Corona Warriors felicitated by Tiroda Taluka Press Association ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.