कोरोना व्हायरस प्रतिबंधक कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST2020-04-17T05:00:00+5:302020-04-17T05:00:09+5:30

देशात व राज्यात धुमाकूळ घालणाºया कोविड-१९ या जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्याचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. या काळात संचारबंदीची व लॉकडाउन अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस विभाग अहोरात्र परिश्रम घेत आहे.

Corona Virus Prevention Workshop | कोरोना व्हायरस प्रतिबंधक कार्यशाळा

कोरोना व्हायरस प्रतिबंधक कार्यशाळा

ठळक मुद्देविजय राऊत यांचे मार्गदर्शन : आरोग्यसेतू अ‍ॅप डाऊनलोड करा

लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : पोलीस ठाणे नवेगावबांध येथे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बुधवारी (दि.१५) कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
देशात व राज्यात धुमाकूळ घालणाºया कोविड-१९ या जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्याचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. या काळात संचारबंदीची व लॉकडाउन अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस विभाग अहोरात्र परिश्रम घेत आहे. त्यामुळे पोलिसांचे आरोग्य सुरिक्षत रहावे, त्यांना कर्तव्य बजावित असताना स्वत:ची काळजी कशी घ्यावी. यावर खबरदारी उपाय म्हणून नवेगावबांध पोलीस ठाण्यात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच सी-६० पथकातील जवानांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत कोरोना व्हायरसचा प्रतिबंध कसा करावा? याची लक्षणे काय? याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय राऊत यांनी पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी व सी ६० पथकातील जवान यांना मार्गदर्शन केले. डॉ. विजय राऊत यांनी पोलीस स्टेशन अधिकारी कर्मचारी यांना कोरोना विषाणूपासुन बचाव करण्यासाठी उपाययोजना बाबत माहिती दिली. तसेच आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी आवाहन केले. त्याबाबत माहिती समजावून सांगितली. सॅनिटायझरबाबत सविस्तर माहिती दिली.
हात स्वच्छ करण्याची पद्धत समजावून सांगितली. तसेच कोरोना फ्फुफुसावर कशाप्रकारे नियंत्रण मिळवतो याबाबत माहिती देऊन, आपली रोगप्रतिकारक शक्ती कशाप्रकारे वाढवून कोरोना विषाणूला आपल्यापासून दूर ठेवायचे यावर मार्गदर्शन केले.या वेळी नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिनकर ठोसरे, सी-६० पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बिचेवार व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

 

Web Title: Corona Virus Prevention Workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.