चांदोरी खुर्द येथील कोरोना दक्षता विभाग कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST2020-03-22T06:00:00+5:302020-03-22T06:00:15+5:30
तिरोडा तालुक्यात परदेशातून येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. १६ जण परदेशातून आले असल्याचे सांगितले. पण येणाºयांची संख्या जास्त आहे. प्रशासनाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. एकही चमू ग्रामीण भागात सर्व्हेक्षण करताना दिसत नाही. काही ठिकाणी खदानीचे काम सुरु आहे.

चांदोरी खुर्द येथील कोरोना दक्षता विभाग कागदावरच
लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील ग्राम चांदोरी खुर्द येथील नवीन इमारतीत कोरोना रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग सुरु करण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आले आहे. त्यानुसार, तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात ५ खाटांचे विलगीकरण तात्पुरते करण्यात आले आहे. पण चांदोरी खुर्द येथील नवीन इमारत रिकामी असल्याने येथे १३ खाटांचे विलगीकरण अतिदक्षता विभाग सुरु करण्याचे ठरविले व सुरु झाल्याचे प्रशासनाला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल मोहने यांनी दिली. मात्र ३ दिवसाचा काळ लोटला तरी त्यात एक खाट ही लावण्यात आले नाही व साधा एक कर्मचारीही नाही अशी आरोग्य विभागाची व्यवस्था दिसून येत आहे.
तिरोडा तालुक्यात परदेशातून येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. १६ जण परदेशातून आले असल्याचे सांगितले. पण येणाºयांची संख्या जास्त आहे. प्रशासनाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. एकही चमू ग्रामीण भागात सर्व्हेक्षण करताना दिसत नाही. काही ठिकाणी खदानीचे काम सुरु आहे. त्या ठिकाणी मजूर एकत्र काम करतात. पण खबरदारीचा उपाय म्हणून साधे माक्स ही किंडगीपार येथील दगड खदानीतील मजुरांना दिलेले नाही.
चांदोरी उपकेंद्रात कोरोना विलगीकरणाची व्यवस्था झाली नसून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन योग्य कार्यवाही करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
एकीकडे शासन मोठ्या प्रमाणात कोरोनापासून दूर राहून काळजी घेण्यास गावागावात उपाय करुन नागरिकांना मदत व सहकार्य करीत आहे. तर दुसरीकडे वैद्यकीय सेवा देणारेच दुर्लक्ष करीत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी वरिष्ठ अधिकाºयांकडे करण्यात आली आहे.