कोरोनामुळे विकासाची घडी विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:31 AM2021-01-19T04:31:10+5:302021-01-19T04:31:10+5:30

बाजारात वीज व्यवस्थेची मागणी सौंदड : येथे आठवडी बाजार भरतो व रस्त्यावर रहदारी अधिकच असल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ...

The corona shattered the clock of development | कोरोनामुळे विकासाची घडी विस्कटली

कोरोनामुळे विकासाची घडी विस्कटली

Next

बाजारात वीज व्यवस्थेची मागणी

सौंदड : येथे आठवडी बाजार भरतो व रस्त्यावर रहदारी अधिकच असल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या रस्त्यावर रात्रीच्यावेळी अंधाराचा सामना करावा लागतो. हा रस्ता सौंदड, पिपरी, कोहमारा या रस्त्याला जोडलेला असून रस्त्यावर नेहमी लोकांची वर्दळ असते. तसेच येथील वॉर्ड क्रमांक-३ मधील सर्व जनता याच मार्गाने ये-जा करते.

पिकाच्या संरक्षणासाठी झटका मशीन वरदान

नवेगावबांध : ज्या शेतकऱ्यांच्या पिकांची वन्यप्राण्यांपासून नासाडी होत आहे, अशा शेतकऱ्यांना झटका मशीन म्हणजे एक वरदानच आहे. तरी शेतकऱ्यांनी या झटका मशीनचा वापर पिकांच्या संरक्षणासाठी करावा, असे प्रतिपादन माती परीक्षण केंद्राचे जिल्हा नियंत्रण अधिकारी आर. एम. रामटेके यांनी केले आहे.

वातावरणातील बदलामुळे भीती

गोंदिया : कोरोना विषाणू महामारीचे संकट डोक्यावर घोंगावत असतानाच अचानक होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखीसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. यामुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण होवून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.

रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा

गोंदिया : शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात उखडलेले असून त्यावर खड्डे पडलेले आहे. पावसाळ्यात त्यामुळे नागरिकांना रहदारीला फारच त्रास होतो. अशात मात्र रस्त्यांच्या या दुर्गतीमुळे अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. खड्ड्यांमुळे कित्येकदा अपघात घडले आहेत. नगर परिषदेने याकडे लक्ष देत रस्ता दुरूस्तीची गरज आहे.

बाजारातील रस्ते मोकळे करा

गोंदिया : बाजारपेठेतील रस्ते अगोदरच अरूंद आहेत. त्यातही दुकानदार त्यांच्या दुकानातील सामान व बोर्ड्स रस्त्यावर आणून ठेवतात. परिणामी नागरिकांना रस्त्याने ये-जा करण्यासाठी रस्ते आणखीच अरुंद होतात. अशात त्यांची वाहनेही रस्त्यावरच उभी केली जात असल्याने अन्य नागरिकांना ये-जा करताना अडचण होते. हा प्रकार लक्षात घेत वाहतूक नियंत्रण शाखा तसेच नगर परिषदेने कठोर पाऊल उचलत बाजारातील रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्याची मागणी आहे.

कामगारांची योजना पूर्ववत सुरू करा

गोंदिया : कामगार कल्याणकारी मंडळाने गरीब मजुरांना थेट पाच हजार रुपये देण्याची योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी होत आहे.

कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी

सडक-अर्जुनी : मुंबई-कलकत्ता या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ६ वर कोहमारा गाव आहे. मात्र, कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची कुठलीही सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. येथे प्रवासी निवारा देण्याची मागणी केली जात आहे.

स्वत:च्या घरकुलाचे स्वप्न होणार साकार

सडक-अर्जुनी : सर्वांसाठी घरे-२०२० हे केंद्र शासनाचे महत्त्वाचे धोरण असून राज्य शासनानेदेखील या धोरणाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे आता नागरिकांचे स्वत:च्या घरकुलाचे स्वप्न साकार होत असल्याचे दिसत आहे.

तक्रार निवारणाकडे बीएसएनएलचे दुर्लक्ष

गोंदिया : दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. इंटरनेट व मोबाईल फोन प्रत्येकाची गरज बनली आहे. बीएसएनएलमार्फत इंटरनेट ब्रॉडबँड सेवा पुरविली जात आहे. मात्र, या सेवा ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र तरीही ग्राहकांच्या तक्रारींकडे बीएसएनएलचे दुर्लक्ष आहे.

Web Title: The corona shattered the clock of development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.