कोरोना बाधितांचा ग्राफ पुन्हा डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 05:00 IST2020-10-12T05:00:00+5:302020-10-12T05:00:11+5:30

जिल्ह्यात मागील सात महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरीभागात कोरोनाचा अधिक संसर्ग आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी गावबंदी, गावाचे सॅनिटायझेशन आणि जनता कर्फ्यू सारख्या प्रभावी उपाययोजना केल्या. त्याचे सुध्दा ग्रामीण भागात चांगले परिणाम दिसून येत आहे. जिल्ह्यात ९४५ गावांपैकी आतापर्यंत दोनशेवर गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

Corona Infected Graph down again | कोरोना बाधितांचा ग्राफ पुन्हा डाऊन

कोरोना बाधितांचा ग्राफ पुन्हा डाऊन

ठळक मुद्दे७३ बाधितांची कोरोनावर मात : ४० नवीन बाधितांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
गोदिया : ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यात कोरोना बाधितांचा ग्राफ सातत्याने डाऊन होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. तर कोरोनावर मात करणाऱ्यांचा आलेख उंचावत असून रविवारी (दि.११) जिल्ह्यातील ७३ बाधितांनी कोरोनावर मात केली. ४० नवीन बाधितांची नोंद झाली आहे. तर मृतकांच्या संख्येत सुध्दा घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात मागील सात महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरीभागात कोरोनाचा अधिक संसर्ग आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी गावबंदी, गावाचे सॅनिटायझेशन आणि जनता कर्फ्यू सारख्या प्रभावी उपाययोजना केल्या. त्याचे सुध्दा ग्रामीण भागात चांगले परिणाम दिसून येत आहे. जिल्ह्यात ९४५ गावांपैकी आतापर्यंत दोनशेवर गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तर ७५० वर गावांनी कोरोनाला अद्यापही वेशीवरच रोखल्याचे दिलासादायक चित्र आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक कोरोना बाधित हे गोंदिया, तिरोडा आणि आमगाव तालुक्यात आढळले आहे. गोंदिया आणि आमगाव तालुक्यात रुग्ण वाढीचा वेग कायम आहे. तर उर्वरित तालुक्यात परिस्थिती आटोक्यात आहेत. जिल्ह्यात रविवारी (दि.११) आढळलेल्या ४० कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक २५ कोरोना बाधित हे गोंदिया तालुक्यातील आहेत. तर तिरोडा ९, गोरेगाव ०, आमगाव १, सालेकसा १, देवरी १, सडक अर्जुनी १ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७८५६ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ७१०५ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर १०७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ६४४ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ३३१३५ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी २५८८६ नमुने निगेटिव्ह आले आहे. २०५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे.

Web Title: Corona Infected Graph down again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.