मुंबईहून आला अन् सोबत घेऊन आला कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST2020-06-28T05:00:00+5:302020-06-28T05:00:33+5:30

शनिवारी (दि.२६) कोरोना बाधित आढळलेला युवक हा गोंदिया तालुक्यातील असून तो २४ जून रोजी मुंबईहून गोंदिया येथे परतला होता. त्याला गोंदिया येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले होते. तसेच त्याचा स्वॅब नमुना घेवून गोंदिया येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. शनिवारी त्याच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.

Corona came from Mumbai with him | मुंबईहून आला अन् सोबत घेऊन आला कोरोना

मुंबईहून आला अन् सोबत घेऊन आला कोरोना

ठळक मुद्देपुन्हा एका कोरोना बाधिताची भर । आतापर्यंत २४५४ नमुने कोरोना निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा सध्या कोरोनामुक्तीच्या मार्गावर असून शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात केवळ दोन कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण होते. मात्र २४ जून रोजी मुंबईहून परतलेल्या गोंदिया तालुक्यातील एका युवकाचा स्वॅब नमुन्याचा अहवाल शनिवारी (दि.२७) कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील अ‍ॅक्टीव्ह कोरोना बाधित रुग्णाचा आकडा तीनवर पोहचला आहे. तर सदर युवक हा मुंबईहून जिल्ह्यात परतल्याने मुंबईहून आला अन सोबत कोरोना घेवून आल्याचे अहवालानंतर स्पष्ट झाले आहे.
२६ मार्च ते २७ जून या कालावधीत जिल्ह्यात एकूण १०५ कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे यापैकी १०२ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आतापर्यंत आपल्या घरी परले आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने दहा दिवसांच्या कालावधीत ते बरे होवून आपल्या घरी परतत आहे. शनिवारी (दि.२६) कोरोना बाधित आढळलेला युवक हा गोंदिया तालुक्यातील असून तो २४ जून रोजी मुंबईहून गोंदिया येथे परतला होता. त्याला गोंदिया येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले होते. तसेच त्याचा स्वॅब नमुना घेवून गोंदिया येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. शनिवारी त्याच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याला जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहे. शनिवारी पुन्हा एका कोरोना बाधिताची नोंद झाल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णाचा आकडा आता तीनवर पोहचला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने एकूण २५६० स्वॅब नमुन्याची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १०५ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर २४६४ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर ३९४ नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.

त्या बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींना केले क्वारंटाईन
गोंदिया तालुक्यातील मुंडीपार येथील एका वृध्दाचा कोरोनाने नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. सदर मृतक वृध्द मुंडीपार येथील एमआयडीसीतील एका कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत होता.त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना आरोग्य विभागाने क्वारंटाईन करुन त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी गोंदिया येथील प्रयोगशाळेत पाठविले आहे. तर मुंडीपार येथील काही परिसर कंटेन्मेंट झोन घोषीत केला आहे.

३९४ स्वॅब नमुन्याचा अहवाल अप्राप्त
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून स्वॅब नमुने घेवून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. सध्या स्थिती गोंदिया येथील प्रयोगशाळेकडे ३९४ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.यासर्व स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून अद्याप जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.

जिल्ह्यात आता दहा कंटेन्मेंट झोन
कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या परिसरात जिल्हा प्रशासनातर्फे खबरदारीची उपाययोजना म्हणून कंटेन्मेंट झोन व बफर झोन घोषीत केले जात आहे.जिल्ह्यात सध्या स्थितीत एकूण १० कंटेन्मेंट झोनचा असून यात नवरगाव, कंटगीकला, गजानन कॉलनी, परसवाडा, चुटीया, रजेगाव, तिरोडा, धनसुवाचा समावेश आहे.

Web Title: Corona came from Mumbai with him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.