शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुबईहून येताना सोबत घेऊन आले कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:00 IST

जिल्ह्यात १० जूनपर्यंत नवीन कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली नव्हती. तर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले सर्व कोरोना बाधित या कालावधीत कोरोनामुक्त झाले. त्यामुळे बुधवारी आणि गुरूवारी जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याने पुन्हा एकदा जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. त्यामुळे जिल्हावासीयांना सुध्दा दिलासा मिळाला होता. मात्र दुबईहून तिरोडा तालुक्यात परतलेल्या तीन जणांपैकी एकाच्या अहवाल शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आला.

ठळक मुद्देअ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या तीन :कोरोनामुक्त जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, ४२ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील सर्व कोरोना बाधित रुग्ण १० जूनपर्यंत कोरोनामुक्त झाले होते. तर याच कालावधीत नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली नव्हती. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. मात्र शुक्रवारी (दि.१२) दुबईहून एकत्र परतलेल्या तिरोडा तालुक्यातील तीन जणांचा स्वॅब नमुन्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दुबईहून येताना सोबत कोरोना घेवून आलेल्या तीन जणांमुळे जिल्ह्यातील अ‍ॅक्टीव्ह कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आता ३ वर पोहचला आहे. तर आत्तापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ७२ वर पोहचली आहे.जिल्ह्यात १० जूनपर्यंत नवीन कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली नव्हती. तर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले सर्व कोरोना बाधित या कालावधीत कोरोनामुक्त झाले. त्यामुळे बुधवारी आणि गुरूवारी जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याने पुन्हा एकदा जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. त्यामुळे जिल्हावासीयांना सुध्दा दिलासा मिळाला होता. मात्र दुबईहून तिरोडा तालुक्यात परतलेल्या तीन जणांपैकी एकाच्या अहवाल शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आला. तर याच व्यक्तीसह आलेला दुसरा व्यक्ती सुध्दा शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. याच तिघांपैकी तिसऱ्या व्यक्तीचा अहवाल रविवारी (दि.१४) कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुुळे जिल्ह्यातील एकूण अ‍ॅक्टीव्ह कोरोना बाधितांचा आकडा ३ वर पोहचला आहे. या तिन्ही कोरोना बाधित रुग्णांवर गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे.जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ७२ कोरोना बाधितांची नोंद झाली असून यापैकी ६९ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने जिल्हावासीयांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब आहे.११४२ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्हकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यत जिल्ह्यातील एकूण १२५६ जणांचे स्वॅब नमुने घेवून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ११४२ नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला. तर आत्तापर्यंत ७२ जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.४२ नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.बाहेरुन येणाऱ्यांमुळे वाढला धोकाजिल्ह्यात बाहेरील जिल्हा, राज्य आणि विदेशातून येणाऱ्यांमुळे जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिरोडा तालुक्यात दुबईहून परतलेल्या तीन जणांमुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाच शिरकाव झाला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बाहेरील जिल्हा, राज्य आणि विदेशातून येणाºयांवर लक्ष ठेवून त्याची वेळीच आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या