जिल्ह्यातील ८२ पोलिसांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:00 IST2020-09-10T05:00:00+5:302020-09-10T05:00:48+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत ८२ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ९ अधिकारी तर ७३ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने नक्षलवाद्यांशी लढा देण्यासाठी भारत बटालियन उभारण्यात आली. परंतु ही भारत बटालीयन नागपूरला कार्यरत आहे. गोंदिया जिल्हा पोलिसांना जशी-जशी बटालीयनच्या जवानांची गरज पडली तसे-तसे त्यांना गोंदिया जिल्ह्यात बोलाविले जाते.

Corona to 82 policemen in the district | जिल्ह्यातील ८२ पोलिसांना कोरोना

जिल्ह्यातील ८२ पोलिसांना कोरोना

ठळक मुद्देपाच होमगार्डही आले पॉझिटिव्ह : ३० अधिकारी कर्मचारी क्वारंटाईन

अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
ुेगोंदिया : जिल्ह्यातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सामान्य जनतेबरोबर अधिकारी, कर्मचारी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापासून पोलीस विभाग कसा सुटणार? गोंदिया जिल्हा पोलिसांच्या आस्थापनेवर असलेल्या तसेच नक्षलवाद्यांशी लढा देण्यासाठी आलेल्या भारत बटालियनच्या जवानांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ८२ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ९ अधिकारी तर ७३ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने नक्षलवाद्यांशी लढा देण्यासाठी भारत बटालियन उभारण्यात आली. परंतु ही भारत बटालीयन नागपूरला कार्यरत आहे. गोंदिया जिल्हा पोलिसांना जशी-जशी बटालीयनच्या जवानांची गरज पडली तसे-तसे त्यांना गोंदिया जिल्ह्यात बोलाविले जाते. नागपूरवरून ये-जा करण्याच्या नादात भारत बटालियनच्या जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे बोलल्या जाते. जिल्हा पोलीस विभागाच्या आस्थापनेवर असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे.
पाच होमगार्ड सुध्दा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

२४ पोलीस कोरोना क्रियाशील
४सद्यस्थितीत तीन पोलीस अधिकारी व १८ पोलीस कर्मचारी असे २४ जण कोरोनाचे क्रियाशील रूग्ण आहेत. यात तीन भारत बटालीयनचे जवान आहेत. तर ३० पोलीस अधिकारी-कर्मचारी क्वारंटाईन असून त्यात ४ अधिकारी, एक लिपीक, दोन भारत बटालीयनचे जवान तर २३ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
५८ पोलीस कोरोनामुक्त
४गोंदिया जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे, एओपी व पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली होती. यातून कोरोनामुक्त होणाºयांत ६ अधिकारी, सात लिपीक व ४५ कर्मचारी असे ५८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.तर पाच होमगार्ड देखील कोरोनामुक्त झाले आहेत.

Web Title: Corona to 82 policemen in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.