शेतीचा वादातून चुलत भावाने केला चाकूने हल्ला

By नरेश रहिले | Published: January 27, 2024 04:26 PM2024-01-27T16:26:31+5:302024-01-27T16:27:30+5:30

शेतीच्या वादातून चुलत भावाने चाकूने प्राणघातक हल्ला केला.

Controversy between Cousin regarding farm cousin attacked with a knife | शेतीचा वादातून चुलत भावाने केला चाकूने हल्ला

शेतीचा वादातून चुलत भावाने केला चाकूने हल्ला

नरेश रहिले, गोंदिया : शेतीच्या वादातून चुलत भावाने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना तिरोडा तालुक्यातील ग्राम खैरीटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेदरम्यान घडली.

आरोपी उमेश भगवान पुराम (२४) या तरुणाने यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैरीटोला येथील वार्षिक स्नेहसंमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना आरोपी चुलतभाऊ उमेश भगवान पुराम (२४) हा मोटारसायकल घेऊन बिरसा मुंडा पुतळ्याजवळ आला. हातात तलवार घेऊन तो लालचंद बळीराम पुराम (३८) यांच्या दिशेने धावला. मात्र, तलवार विश्वास शिवकुमार तुमसरे याने हिसकावली असता तो पुन्हा २० मिनिटांनी चाकू घेऊन आला आणि लालचंद यांच्यावर मागून हल्ला केला. या घटनेसंदर्भात तिरोडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक दलालवाड करीत आहेत.

Web Title: Controversy between Cousin regarding farm cousin attacked with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.