शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृती, मास्क निर्मिती आणि उद्योगाला हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST

देशातून कोरोनाचा नायनाट व्हावा यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. राज्यात सवार्धिक रूग्ण असल्याने राज्य शासनही लढा देत आहे. अशात माविमच्या बचतगटातील महिलांंनी सुद्धा आपली कंबर कसली असून शासनाच्या लढ्यात हातभार लावण्यासाठी सरसावल्या आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी माविमच्या बचतगटातील महिला गावोगावी पोस्टर्सवर संदेश लिहून जनजागृती करीत आहे.

ठळक मुद्देमाविमच्या महिला सरसावल्या : २२ हजार मास्कची निर्मिती करून केली विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्थापन ग्रामीण आणि शहरी भागातील बचतगटांच्या महिला कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रशासनाला साथ देण्यासाठी उतरल्या आहेत. माविमच्या या महिला गावोगावी पोस्टर्सच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जनजागृतीचा संदेश देत आहे. तसेच कापडी मास्कची निर्मिती करीत आहे. एवढेच नव्हे तर बँक करस्पाँडंट या नात्याने देखील काम करीत आहे.देशातून कोरोनाचा नायनाट व्हावा यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. राज्यात सवार्धिक रूग्ण असल्याने राज्य शासनही लढा देत आहे. अशात माविमच्या बचतगटातील महिलांंनी सुद्धा आपली कंबर कसली असून शासनाच्या लढ्यात हातभार लावण्यासाठी सरसावल्या आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी माविमच्या बचतगटातील महिला गावोगावी पोस्टर्सवर संदेश लिहून जनजागृती करीत आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात कोरोना विषाणूबाबत नागरिकांमध्ये जागृती होत असून लोक दक्षता घेऊ लागले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील माविमच्या सहा हजार २८ बचतगटांतील हजारो महिलांनी या कार्यात भाग घेतला आहे.विशेष म्हणजे, या महिला कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नाक आणि तोंड झाकण्यासाठी वापरण्यात येणारे कापडी मास्क तयार करून विक्रीही करीत आहेत. येथील उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्राच्या कापडी पिशवी उद्योग निर्मिती केंद्रात ग्रामीण व शहरी भागातील बचतगटांच्या महिला आधुनिक शिलाई मशीनवर कापडी मास्क तयार करीत आहे. आतापर्यंत या महिलांनी २१ हजार ६०० मास्क तयार करून त्याची विक्री केली आहे.मास्क निर्मितीतून या महिलांना रोजगाराचे एक साधन उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मास्क निर्मिती करून महिलांनी आपले योगदान दिले आहे.बँकेचे सेवक म्हणून देत आहेत सेवागर्दी टाळणे आणि सामाजिक अंतर ठेवणे कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाययोजनेचा एक भाग आहे. अशात मात्र अनेक योजनांचे अनुदान लाभार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा होत आहे. ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक आहे अशा लाभार्थ्यांना माविमच्या ५२ महिला बँक करस्पॉडंटची भूमिका निभावून त्यांच्याजवळ असलेल्या मायक्रो एटीएमच्या माध्यमातून घरबसल्या रक्कम मिळवून देत आहे. यामुळे ग्रामीण भागातील अनेक लाभार्थ्यांची बँकेतून पैसे काढण्यासाठी होणारी पायपीट तर थांबली आहेच सोबतच कोरोना विषाणूच्या संसर्गापासून विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा बचाव करण्यास मदत होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या