मीठ खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST2020-05-14T05:00:00+5:302020-05-14T05:00:38+5:30

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीत काही किराणा व्यावसायीकांनी अव्वाच्या सव्वा दराने वस्तूंची विक्री करुन चांदी करुन घेतली. त्यानंतर आता मिठाची टंचाई निर्माण होणार आहे, त्यामुळे मीठ मिळणार नाही अशी अफवा ग्रामीण भागात पसविण्यात आली. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून खरोखरच मीठ मिळणार नाही म्हणून मिठाचे पुडे आणि पोती नागरिक खरेदी करुन ठेवीत आहे.

Consumers jump for salt purchases | मीठ खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या

मीठ खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या

ठळक मुद्देटंचाईची अफवा : ग्रामीण भागात विक्रमी विक्री, अफवांवर विश्वास ठेवू नका

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लॉकडाऊमुळे मिठाची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होणार असल्याची अफवा जिल्ह्यातील ग्रामीण फसरविण्यात आली. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून ग्रामीण भागातील नागरिक मिठाची खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी करीत आहे. त्यामुळे मागील दोन दिवसात दुकानांमधून विक्रमी मिठाची विक्री झाली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीत काही किराणा व्यावसायीकांनी अव्वाच्या सव्वा दराने वस्तूंची विक्री करुन चांदी करुन घेतली. त्यानंतर आता मिठाची टंचाई निर्माण होणार आहे, त्यामुळे मीठ मिळणार नाही अशी अफवा ग्रामीण भागात पसविण्यात आली. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून खरोखरच मीठ मिळणार नाही म्हणून मिठाचे पुडे आणि पोती नागरिक खरेदी करुन ठेवीत आहे.
देवरी तालुक्यातील ककोडी सारख्या दुर्गम भागात तर १० रुपयांचा मिठाचा पुडा ३० रुपयांना विक्री केला जात आहे. तर १६० रुपयांना मिळणारी ठोकळ मिठाची पोती ३०० रुपयांना विक्री केली जात आहे. हाच प्रकार मंगळवारी सडक अर्जुनी तालुक्यात दिवसभर पाहयला मिळायला. डव्वा, म्हसवानी परिसरातील नागरिकांनी मिठाची खरेदी करण्यासाठी किराणा दुकानांमध्ये गर्दी केली होती.
अर्जुनी मोरगाव आणि सालेकसा, देवरी तालुक्यात सुध्दा हे चित्र होते. नेहमी एक दोन मिठाचे पुडे खरेदी करणारे ग्राहक चक्क मिठाची चुंगडीच विकत घेवून जात होते. मिठाशिवाय जेवणाला सुध्दा चव येत नसल्याने स्वंयपाकातील महत्त्वपूर्ण घटक असल्याने अनेकांनी टंचाई निर्माण झाली तर काय करायचे या काळजीपोटी अनेकांनी मिठाची अतिरिक्त खरेदी करुन ठेवली होती. त्यामुळे किराणा दुकानादारांकडून सुध्दा मोठ्या प्रमाणात मिठाची मागणी केली जात आहे.
दरम्यान काही सुज्ञ नागरिकांनी याची जिल्हाधिकारी आणि पुरवठा विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी सर्व तहसीलदारांना यासंदर्भात निर्देश देऊन नियंत्रण ठेवण्यास सांगितले. मिठाची टंचाई नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगितले.

मिठाच्या स्टॉकची माहिती घेणार
जिल्हा पुरवठा विभागाकडून आत्तापर्यंत जिल्ह्यात किती प्रमाणात मिठाचा साठा आहे. याची माहिती घेतली जात नव्हती. तशी वेळ कधीच आली नव्हती. मात्र मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मिठाच्या टंचाईच्या अफवेने प्रशासनाची सुध्दा झोप उडाली आहे. त्यामुळे आता मिठाच्या स्टॉकची माहिती घेतली जात आहे. मिठाची टंचाई निर्माण होण्याची कुठलीच शक्यता नसली तरी लोक अफवेला बळी पडून मोठ्या प्रमाणात मिठाची खरेदी करीत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात मिठाचा भरपूर साठा असून मिठाची टंचाई निर्माण होण्याचा प्रश्नच नाही. काही अज्ञात लोकांनी मिठाच्या टंचाईची अफवा फसरविल्याने ग्रामीण भागातील लोकांची दिशाभूल होत आहे. मात्र खोट्या अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच नागरिकांनी अशा खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मिठाची टंचाई निर्माण होण्याचा प्रश्नच नाही.
- डी.एस.वानखेडे
जिल्हा पुरवठा अधिकारी गोंदिया.

Web Title: Consumers jump for salt purchases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.