शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पना प्रत्यक्षात होतेय साकार

By admin | Updated: April 30, 2017 00:55 IST

विजेची बचत करण्यासोबतच नैसर्गिक हवेत भर उन्हाळ्यातही गारव्याचा अनुभव देणारा गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांचा छतावरील तणसाचा प्रयोग ....

तणसाचा प्रयोग : वीज बचतीसाठी अनेकांचा पुढाकारगोंदिया : विजेची बचत करण्यासोबतच नैसर्गिक हवेत भर उन्हाळ्यातही गारव्याचा अनुभव देणारा गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांचा छतावरील तणसाचा प्रयोग आता अनेक जण करून पाहात आहेत. या प्रयोगातून त्यांना आलेले अनुभव आणि होणारी वीज बचत यामुळे प्रभावित झालेले लोक इतरांनाही हा प्रयोग करण्याचा सल्ला देत आहेत.कडक उन्हापासून स्लॅबच्या घरांना वाचविणाऱ्या या अनोख्या प्रयोगाची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर याबाबत अनेकांची उत्सुकता जागरूक झाली होती. त्यातूनच काही लोकांनी जिल्हाधकाऱ्यांच्या बंगल्याला भेट देऊन त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. जिल्हधिकाऱ्यांनीही तेवढ्याच उत्साहाने त्यांना ही माहिती देत हा प्रयोग शक्य आहे त्या सर्वांनीच करावा असे आवाहन केले.गोंदियाच्या सिव्हील लाईनमधील डॉ.प्रशांत कटरे, दिनेश पटेल, श्याम चंदनकर, अभियंता विकास देशपांडे, आर्ट आॅफ लिव्हींगचे मनोज अग्रवाल आदींनी आपल्या घरावर धानाच्या तणसाचे आवरण टाकून त्यावर पाण्याचा मारा दिला. यामुळे त्यांचे घर एसी आणि कुलरशिवाय थंड होऊ लागले. त्यांना आपला हा अनुभव ज्यांच्यामुळे या प्रयोगाची प्रेरणा मिळाली त्या जिल्हधिकारी काळे यांना सांगितला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: त्यांच्या घरांना भेट देऊन पाहणी केली.नाममात्र किमतीत मिळणारे हे तणस घरावर टाकण्यासाठी हवे असल्यास ते मोफत देण्याची तयारी बबलू चव्हण (९४०३३७४०४४) यांनी दर्शविली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)