फिजिकल डिस्टसिंग ठेवून तेंदूपत्ता संकलनाचे कार्य सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:00 IST2020-05-16T05:00:00+5:302020-05-16T05:00:25+5:30
यावर्षी जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूच्या इफेक्टमुळे तेंदूपत्ता लिलाव प्रक्रिया उशीरा केली. उशीरा का होईना तेंदूपत्ता कंत्राटदारांना तेंदूपत्ता संकलन करण्याची मंजुरी दिल्याने परिसरातील जंगल व्याप्त केळवद, करांडली, गवर्रा, परसटोला, वारव्ही, चिचोली, गोठणगाव या गावात तेंदूपत्ता संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहेत. शासनास या तेंदूपत्ता संकलनाच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांचा महसूल मिळतो.

फिजिकल डिस्टसिंग ठेवून तेंदूपत्ता संकलनाचे कार्य सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : ‘लॉकडाऊन’मुळे उद्योगधंदे व अन्य कामे बंद पडल्याने मजुरांची चांगलीच अडचण निर्माण झाली. अशात उशीरा का होईना तेंदूपत्ता संकलन करण्यास खाजगी कंत्राटदारांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिल्याने या परिसरात तेंदूपत्ता संकलन केंद्र मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आले आहे. यामुळे तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना रोजगार मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. प्रत्येक मजुरामध्ये फिजिकल डिस्टंन्सिग ठेवून तेंदूपत्ता संकलनाचे कार्य सुरू आहे.
यावर्षी जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूच्या इफेक्टमुळे तेंदूपत्ता लिलाव प्रक्रिया उशीरा केली. उशीरा का होईना तेंदूपत्ता कंत्राटदारांना तेंदूपत्ता संकलन करण्याची मंजुरी दिल्याने परिसरातील जंगल व्याप्त केळवद, करांडली, गवर्रा, परसटोला, वारव्ही, चिचोली, गोठणगाव या गावात तेंदूपत्ता संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहेत. शासनास या तेंदूपत्ता संकलनाच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांचा महसूल मिळतो. तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम जवळपास १ महिना सुरू असतो. या हंगामासाठी या परिसरातील अनेक गावांमधील मजुरांना रोजगार प्राप्त झाला आहे. तेंदूपत्ता हंगामातून प्रत्येक मजुरांच्या कुटुंबाना २० ते ३० हजार रूपयांचा रोजगार मिळत आहे. त्यामुळे तेंदूपत्ता मजुरांना २२० ते २३० रूपये शेकडा प्रमाणे मजुरी प्राप्त होत आहे.
या तेंदूपत्ता रोजगारामुळे मजुरांच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक दिसून येत आहे.
एकादिवशी फळी मधून ५० हजार तेंदूपत्ता संकलीत केला जात असल्याचे सांगण्यात आले. यासर्व कार्यात ‘फिजिकल डिस्टंन्सिग ठेवून तेंदू पुडे रचतांना मजूर दिसले. या कार्यासाठी प्रत्येक मजूर सकाळीच घरून निघून १-१ पानासाठी पूर्ण जंगल पिंजून काढत आहे.
शासनाने विमा कवच द्यावे
तेंदूपत्ता संकलनासाठी मजुरांना दिवसभर जंगलात रहावे लागते. तेंदूपत्ता शोधण्यासाठी पूर्ण जंगल पिंजून काढावे लागते. अशात कित्येक मजुरांवर वन्यप्राण्यांनी हल्ला करून ठार केल्याच्या घटनाही जिल्ह्यात घडल्या आहेत. यामुळे वन्यप्राण्यांपासून केव्हाही धोका होण्याची भीती त्यांच्या मनात असते. करिता शासनाने तेंदूपत्ता मजुरांसाठी विमा संरक्षण योजना सुरू करावी अशी अपेक्षा मजुरांनी व्यक्त केली.