महिलेच्या पोटातून काढला साडेतीन किलोचा गोळा
By Admin | Updated: January 24, 2015 01:20 IST2015-01-24T01:20:14+5:302015-01-24T01:20:14+5:30
घरची परिस्थिीती हलाकीची असल्याने उपचारासाठी पैसे नसताना खासगी डॉक्टर उपचारासाठी नागपूरला जाण्याचा सल्ला देत असल्याने गोंधळात पडलेल्या महिलेला नातेवाईकांनी गंगाबाई स्त्री रूग्णालयात दाखल केले.

महिलेच्या पोटातून काढला साडेतीन किलोचा गोळा
गोंदिया : घरची परिस्थिीती हलाकीची असल्याने उपचारासाठी पैसे नसताना खासगी डॉक्टर उपचारासाठी नागपूरला जाण्याचा सल्ला देत असल्याने गोंधळात पडलेल्या महिलेला नातेवाईकांनी गंगाबाई स्त्री रूग्णालयात दाखल केले. त्या महिलेवर तब्बल दोन तास शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून साडेतीन किलो वजनाचा गोळा काढण्यात आला.
गोंदियाच्या टीबीटोली येथील रजनी दिलीप चौकसे (४८) असे त्या महिलेचे नाव आहे. मागील सहा महिन्यांंपासून तिच्या पोटात दुखणे, शौचास साफ न होणे व रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे त्या महिलेने येथील डॉ.मनिषा गुप्ता यांच्याकडे उपचार केला. त्यांनी तपासणी केल्यावर रजनीला नागपूरला जाण्याचा सल्ला दिला. पैशाची चणचण असल्याने नागपूरला जाणे शक्य नाही. त्यामुळे रजनीला नातेवाईकांना बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात दाखल करण्यात आले. राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत त्या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. गंगाबाई स्त्री रूग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सायास केंद्रे, डॉ. पूनम पारधी, बधीरीकरण तज्ज्ञ डॉ. ललीत कटरे यांनी दोन तास शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून साडे तिन किलो वजनाचा गोळा काढला. यासाठी त्यांना दोन बॉल रक्त लावण्यात आले. गंगाबाई स्त्री रूग्णालयाच्या रक्त पेढीतून ते रक्त पुरविण्यात आले. या गोळ्यामुळे त्यांना अपचन होत होते. पाळीत मोठ्या प्रमाणात रक्त जाणे हा त्रास होता. नंतर या गोळ्यातून कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. तो गोळा काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यासाठी ४० हजार रूपये खासगी डाक्टरांकडे लागणार होते. परंतु राजीव गांधी योजनेंतर्गत ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. आमगाव येथील ओमीता मेश्राम (५०) या महिलेच्या पोटातून डॉ. योगेश सोनारे यांनी एक किलो वजनाचा असाच गोळा काढला आहे. (तालुका प्रतिनिधी)