ककोडी अद्याप दहशतीच्या सावटात

By Admin | Updated: March 20, 2016 02:13 IST2016-03-20T02:13:58+5:302016-03-20T02:13:58+5:30

विषबाधेने येथील चिमुकल्याचा जीव गेला असतानाच गावातील काही रूग्णांना परत उपचारासाठी भर्ती करण्याची पाळी आली आहे.

The cocoon is still in the shadows | ककोडी अद्याप दहशतीच्या सावटात

ककोडी अद्याप दहशतीच्या सावटात

पालकमंत्री, खासदारांची भेट : ककोडी व चिल्हाटी येथे शिबिर
ककोडी : विषबाधेने येथील चिमुकल्याचा जीव गेला असतानाच गावातील काही रूग्णांना परत उपचारासाठी भर्ती करण्याची पाळी आली आहे. यामुळे ककोडीतील गावकरी अद्याप दहशतीच्या सावटातच वावरत आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी मृत मुलाच्या घरी भेट दिली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात भर्ती रूग्णांची विचारपूस केली. तसेच खा.अशोक नेते यांनीही गावात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
या घटनेमुळे ककोडी व चिल्हाटी येथे आरोग्य शिबीर सुरूच आहे. मंडईत मिठाई व गुपचूप खाल्याने येथील महेश कपूरडेहरिया (१२) या चिमुकल्याचा गुरूवारी (दि.१७) मृत्यू झाला. एवढेच
नव्हे तर शेकडोंच्या संख्येत लोकांना विषबाधा झाल्याने या परिसरात खळबळ माजली आहे. विषबाधेने चिमुकल्याचा जीव गेल्याने आरोग्य विभागात हडकंप माजला असून ककोडी व चिल्हाटी येथे आरोग्य शिबीर लावण्यात आले आहे.
विशेष म्हणजे शनिवारीही (दि.१९) चार रूग्णांना परत भर्ती करण्यात आल्याने येथील नागरिकांत धडकी भरली आहे. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले व आमदार संजय पुराम यांनी शनिवारी (दि.१९) मृत महेशच्या घरी भेट देऊन परिवाराचे सांत्वन केले व आर्थिक मदत केली. तर आमदार पुराम यांनी मुख्यमंत्री मदत निधीतून मदत करण्याचे आश्वासन दिले.
पश्चात त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन भर्ती रूग्णांची विचारपूस केली. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दुष्यंत हुमणे यांना वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन रूग्णांवर उपचार करण्यास सांगीतले. (वार्ताहर)

पाण्याचे नमुने घेतले
पाण्यामुळे घडलेल्या या प्रकाराची दखल घेत आरोग्य विभागाकडून चिल्हाटी, ककोडी, मुरमाडी, तुमडीकसा, वडेकसा, धवलखेडी व गणूटोला येथे आरोग्यसेविकांच्या माध्यमातून गावकऱ्यांना औषध देण्यात आले. तसेच या गावांतील पाण्याच्या स्रोतांमधून नमुने घेण्यात आले आहेत. गावात अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज गहलोत लक्ष ठेवून आहेत. तर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दुष्यंत हुमणे हे सुद्धा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Web Title: The cocoon is still in the shadows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.