शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

नगर परिषदेक डे डासनाशक औषधच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 23:50 IST

शहरात विविध प्रकारचे डास व किटकजन्य आजार पसरत असतानाच यावर नियंत्रणासाठी नगर परिषदेकडे किटकनाशक औषध नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यावरून नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी किती तत्परतेने काम करीत आहेत याची प्रचिती येते.

ठळक मुद्देशहरवासीयांचा जीव धोक्यात : आता करणार खरेदी, पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरात विविध प्रकारचे डास व किटकजन्य आजार पसरत असतानाच यावर नियंत्रणासाठी नगर परिषदेकडे किटकनाशक औषध नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यावरून नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी किती तत्परतेने काम करीत आहेत याची प्रचिती येते.नगर परिषद स्वच्छता विभागाकडून औषध खरेदी करू असे आश्चर्यजनक उत्तर मिळाले. अशात मात्र शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जिल्ह्यात स्क्रब टायफस, डेंग्यू व स्वाईन फ्लू पाय पसरत आहे. डेंग्यूचे रूग्ण शहरात आढळत असतानाच स्क्रब टायफसने बुधवारी शहरातील एक व्यक्तीचा मृत्यू झाला. डास व किटकजन्य आजारांची सध्या साथच पसरत असल्याने शहरवासीयांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यामुळे साथरोग नियंत्रणासाठी शहरात डासनाशक फवारणी करणे गरजेचे आहे.हिवताप नियंत्रण विभागाकडून यासाठी ग्रामीण भागात किटकनाशक फवारणी केली जाते. मात्र गोंदिया शहर नगर परिषद क्षेत्रात असल्याने शहरात किटकजन्य आजारांवर प्रतिबंधक मोहीेम राबविण्याची जबाबादारी नगर परिषदेची आहे. मात्र नगर परिषद आपली जबाबदारी वहन करण्यात असमर्थ दिसून येत आहे. विशेष म्हणजे नगर परिषदेकडे किटकनाशक फवारणीसाठी कुठलेच औषधच नाही. नगर परिषदेने ३० जूनला हिवताप विभागाकडून ३० लिटर बीटीआय द्रव्य आणले होते. त्याच्या भरोश्यावर नगर परिषदेने आतापर्यंत शहरात फवारणी केली.मात्र ते औषधही २६ सप्टेंबर रोजी संपल्याची माहिती आहे. म्हणजेच, आता आजारांचा उद्रेक वाढत असताना त्याला प्रतिबंध लावण्यासाठी नगर परिषदेकडे औषधच उपलब्ध नाही.यावरून नगर परिषदेचा कारभार किती सुरळीत चालत आहे याची प्रचिती येते. अधिकारी व कर्मचारी आपले खापर दुसºयावर फोडून हात झटकण्याचे प्रकारही बघावयास मिळत आहे.औषधांची थेट खरेदी नगर परिषदेकडूनआतापर्यंत वर्षभरासाठी लागणाºया औषधांची निविदा काढून खरेदी केली जात होती. मात्र आता ही पद्धत संपुष्टात आल्याचे दिसत आहे. शिवाय आता पुरवठाधारकही निविदांमध्ये रूची घेत नसल्याचेही चित्र आहे. कारण, नगर परिषदेने औषध खरेदीसाठी एप्रिल, मे व जून महिन्यात निविदा काढली होती. त्यात एप्रिल महिन्यात, मे महिन्यात एक व जून महिन्यातील दोन निविदांत दोनच पुरवठादारांनी निविदा टाकल्याची माहिती आहे. त्यामुळे आता थेट औषध खरेदी करून काम भागविण्याचे काम नगर परिषद स्वच्छता विभागाकडून केले जात आहे. त्यातही किटकनाशक द्रव्यासाठी नगर परिषद हिवताप विभागाच्या भरवशावर अवलंबून राहत असल्याचेही दिसते. तेथून द्रव्य आणून नगर परिषद आपले काम काढत आहे.स्वच्छता विभागाचा कारभार संशयास्पदनगर परिषद स्वच्छता विभागाकडून नियमीत फवारणी केली जात असल्याचे सांगीतले जाते. यासाठी १२ कंत्राटी तत्वावर मजूर घेण्यात आली आहेत. एका प्रभागात दोन मजूर पाठवून फवारणी केली जात असल्याचे सांगीतले जाते. एप्रिल महिन्यापासून फवारणी सुरू असल्याचे सांगीतले जात असतानाच, एवढ्या नियमीतपणे फवारणी होत असताना शहरात आजारांचा जोर वाढणे आश्चर्यजनक व तेवढीच धक्कादायक बाब आहे. सातत्याने फवारणी झाल्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात डास व किटकांची उत्पत्ती होत असल्याने फवारणीला घेऊन संशय येतो. यात एकतर फवारणीसाठी वापरले जाणारे द्रव्य योग्य नाही किंवा फवारणी योग्य रित्या होत नाही हे मात्र नक्की.