व्यवसाय करणाऱ्यांच्या वेळेत बदल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:01 IST2020-06-29T05:00:00+5:302020-06-29T05:01:00+5:30
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी व शेतमजूर वर्ग राहतो व ते दिवसभर शेतात काम करतात. वेळेच्या बंधनामुळे किराणा व भाजीपाल्याची दुकाने बंद होतात. त्यामुळे त्यांची मोठी फजिती होते. परिणामी ग्रामीण भागातील किराणा व भाजीपाला विक्रेत्यांच्या वेळेत बदल करुन सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत करण्यात यावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

व्यवसाय करणाऱ्यांच्या वेळेत बदल करा
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा-कोयलारी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील औषध दुकाने वगळून ईतर दुकाने सुरु ठेवण्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत ठरवून देण्यात आली आहे. मात्र गावोगावी फिरुन मॅटाडोरद्वारे राजरोसपणे किराणा सामानाची विक्री करणाऱ्या फिरस्ती दुकानदारांना मुभा का?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी व शेतमजूर वर्ग राहतो व ते दिवसभर शेतात काम करतात. वेळेच्या बंधनामुळे किराणा व भाजीपाल्याची दुकाने बंद होतात. त्यामुळे त्यांची मोठी फजिती होते. परिणामी ग्रामीण भागातील किराणा व भाजीपाला विक्रेत्यांच्या वेळेत बदल करुन सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत करण्यात यावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या परिसरात मोठ्या प्रमाणात किराणा सामान विक्रेते मॅटाडोरमध्ये सामान भरुन गावागावांत फिरुन सामानाची विक्री करतात. ते गावोगावी फिरल्याने शेकडो लोकांच्या संपर्कात येतात. अशात कोरोना संसर्गाची बाधा होण्याची दाट शक्यता असते. एवढेच नाही तर ते सकाळपासून रात्रपर्यंत सामानाची विक्रीही करतात. यावर मात्र स्थानिक प्रशासन कोणतीच कारवाई करत नाही, हे विशेष.
आजघडीला प्रत्येक खेड्यापाड्यात छोटे-छोटे किराना व भाजीपाला व्यवसायीक आहेत. गावातील व्यक्ती गावातल्याच दुकानातून सामानाची खरेदी-विक्री करत असेल तर कोरोना संसर्गाची पाहिजे तेवढी भिती नसते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात तर गर्दीचा प्रश्नच उद्भवत नाही. अशात स्थानिक व्यवसायीकांच्या वेळेत बदल करुन सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंतची वेळ ठरल्यास गावकऱ्यांच्या हिताचे होईल.