२५ वर्षांपासून साजरा होतो प्रकट दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2016 02:11 IST2016-03-02T02:11:26+5:302016-03-02T02:11:26+5:30

शहरातील जुने गोंदिया म्हणजेच शास्त्री वॉर्डातील संत गजानन महाराज मंदिरात मागील २५ वर्षापासून प्रगटदिन व समाधी सोहळा दरवर्षी साजरा केला जातो.

Celebration day is celebrated for 25 years | २५ वर्षांपासून साजरा होतो प्रकट दिन

२५ वर्षांपासून साजरा होतो प्रकट दिन

भजन मंडळाचा उपक्रम : दोन हजार भाविकांचा महाप्रसाद
गोंदिया : शहरातील जुने गोंदिया म्हणजेच शास्त्री वॉर्डातील संत गजानन महाराज मंदिरात मागील २५ वर्षापासून प्रगटदिन व समाधी सोहळा दरवर्षी साजरा केला जातो. सदर उपक्रम ओम त्रिमूर्ती भजन मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
जुन्या गोंदियातील हिराबाई मोरे व गुलाबराव मोरे हे गजानन महाराजांचे भक्त होते. त्यांच्या प्ररणेतून मोहल्यातील लोकांनी एकत्र येऊन गजानन महाराजांच्या मंदिराची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी अविरत गजानन महाराजांचा प्रगटदिन व समाधी सोहळा कार्यक्र अविरत सुरू ठेवला आहे. येथील भक्त मागील २५ वर्षापासून दररोज महाराजांचा अभिषेक, सकाळी व संध्याकाळ आरती, पूजा व दर गुरूवारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दर गुरूवारी २०० लोक महाप्रसाद करतात.
प्रगटदिन व समाधी सोहळ्यानिमीत्त महाराजांची पालकी शहरात काढली जाते. एक दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात भजन, किर्तन होत असते. कार्तिक उत्सवानिमीत्त ३० ते ३५ गावातील भजन मंडळांचे भजन रात्रंदिवस असते. प्रत्येक मोठ्या कार्यक्रमाला २००० भाविकांच्या महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येते. दर गुरूवारी हरिपाठही घेतले जाते. ओम त्रिमूर्ती भजन मंडळामार्फत गजानन मंदिर सांभाळणारी समिती असून त्याचे अध्यक्ष रामलाल गायधने, उपाध्यक्ष पन्नालाल शहारे, कोषाध्यक्ष हिरामन डोंगरवार, सहसचिव अ‍ॅण्ड.के.एम. बन्सोड, संघटक हभप उर्मिला कारेमोरे, सदस्य म्हणून हभप बलरामदादा उके, हभप हिरामन कुंभरे, किशन शेंडे, बाबुलाल कोसरकर, गंगाधर मेश्राम, हभप. विठा भांडारकर, उर्मिला भुते, (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Celebration day is celebrated for 25 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.