असाटी समाजाच्या वतीने वसंत पंचमी उत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:53 AM2021-02-18T04:53:32+5:302021-02-18T04:53:32+5:30

अध्यक्षस्थानी राधेश्याम असाटी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर बजाज, ओमपकाश असाटी, पंकज असाटी, विजय खोब्रागडे, हटेवार, दिनकर ...

Celebrate Vasant Panchami on behalf of Asati Samaj | असाटी समाजाच्या वतीने वसंत पंचमी उत्सव साजरा

असाटी समाजाच्या वतीने वसंत पंचमी उत्सव साजरा

Next

अध्यक्षस्थानी राधेश्याम असाटी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर बजाज, ओमपकाश असाटी, पंकज असाटी, विजय खोब्रागडे, हटेवार, दिनकर बोपचे, अनिल अग्रवाल, पंकज रहांगडाले, बघेले, राधेश्याम पटले, दिनेश कावळे, हटवार उपस्थित होते. याप्रसंगी सुधीर बजाज यांनी भारत देशात विविध सण-उत्सव साजरे केले जातात. धार्मिक बाबी व ऋतूबदल लक्षात घेऊन येथील प्रत्येक सण-उत्सव साजरा केला जातो. यापैकीच वसंत पंचमी हा एक सण आहे. वसंत पंचमीला देवी सरस्वतीचा जन्म झाल्याचे मानले जाते. त्यामुळे यादिवशी सरस्वती देवीचे पूजन केले जाते, असे सांगितले. यावेळी असाटी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती ओम असाटी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मन मोहून घेतले. संचालन आझाद असाटी यांनी केले. आभार अनिल अग्रवाल यांनी मानले.

Web Title: Celebrate Vasant Panchami on behalf of Asati Samaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.