शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

पशुपालकांना मिळणार ३९१ दुधाळू जनावरे

By admin | Updated: May 1, 2017 00:48 IST

हल्लीच्या काळात पशुसंवर्धनासाठी शासनही तत्पर असल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ‘गावाकडे चला’

शेतकऱ्यांना मिळणार जोडधंदा : दोन कोटी ६८ लाखांची तरतूद गोंदिया : हल्लीच्या काळात पशुसंवर्धनासाठी शासनही तत्पर असल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ‘गावाकडे चला’ दिलेल्या या संदेशाला साकारण्यासाठी ग्रामीण भागाच्या उत्थानासाठी शासनानेही लक्ष घातले आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना व पशुपालकांना शासनाकडून विशेष घटक योजनेंतर्गत दुधाळू जनावरांचे वाटप केले जात आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ३९१ दुधाळू जनावरे पशुपालकांना वाटप करण्यात येणार आहेत. जनावरांची कत्तलखान्यात रवानगी करुन त्यांच्या जागी आधूनिक औजारांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु या जनावरांची घटती संख्या पाहून चिंताजनक बाब समाजापुढे येत असल्याने जनावरांची संख्या वाढविण्याकडे शासनाचे लक्ष आहे. सोबतच शेतीमध्ये परवडत नसल्यामुळे ग्रामीण भागातील शेतमजुरांचा लोंढा शहराकडे धाव घेत आहे. शेतकरीही आपली शेती विकून मुलांना नोकरी लावून देण्याच्या नादात सैरावैरा पळत आहे. या प्रकाराला थांबविण्यासाठी तसेच शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय शेतकऱ्यांनी करावा म्हणून विशेष घटक योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून सन २०१६-१७ या वर्षात ३९१ दुधाळू जनावरे जिल्ह्यात वाटप केली जाणार आहे. या योजनेतील लाभार्थ्यांची यादी तयार झाली असून पंचायत समिती स्तरावरुन ही दुधाळू जनावरे लाभार्थ्यांना वाटप केली जाणार आहे. विशेष घटक योजनेंतर्गत दुधाळू जनावरांचे गट वाटपासाठी एक कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहे. या एक कोटी रुपयांतून ३१३ दुधाळू जनावरे लाभार्थ्यांना वाटप केली जाणार आहे. शेळी वाटपासाठी एक कोटी सात लाख ६६ हजार रुपये मिळालेले आहे. त्यासाठी ३०० शेळी गट वाटप केले जाणार आहे. एका शेळी गटात १० बकऱ्या व एका बोकडचा समावेश असतो. ३२३ दुधाळू जनावरांना खाद्य पुरविण्यासाठी ११ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. आदिवासी क्षेत्र उपयोजना (टीएसपी) अंतर्गत ५० दुधाळू जनावरांसाठी १६ लाख रुपये देण्यात आले आहे. ४५ शेळी गटांसाठी १६ लाख १९ हजार रुपये देण्यात आले आहे. आदिवासी क्षेत्राबाहेरील (ओटीएसपी) च्या २९ जनावरांसाठी नऊ लाख २९ हजार रुपये मंजूर करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)