जात वैधता होणार ‘स्मार्ट’
By Admin | Updated: January 28, 2015 23:35 IST2015-01-28T23:35:44+5:302015-01-28T23:35:44+5:30
नागरिकांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी अनेक कष्ट उपसावे लागतात. यात लवचिकता आणण्यासाठी शासनाकडून ‘स्मार्ट कार्ड’ पद्धत आणली जात आहे. या योजनेचे पुणे येथे काम सुरू

जात वैधता होणार ‘स्मार्ट’
अर्जुनी-मोरगाव : नागरिकांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी अनेक कष्ट उपसावे लागतात. यात लवचिकता आणण्यासाठी शासनाकडून ‘स्मार्ट कार्ड’ पद्धत आणली जात आहे. या योजनेचे पुणे येथे काम सुरू असून यात लवचिकता आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच इतर जिल्ह्यात कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहे. यातून जात वैधता अधिक सुकर होईल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. बौध्द समाज तालुका अर्जुनी-मोरगावतर्फे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून शारदा बडोले, पंचायत समितीचे उपसभापती पोमेश्वर रामटेके, भारतीय बौध्द महासभा तालुका अर्जुनी मोरगावचे अध्यक्ष विजय लाडे, सोनदास गणवीर, सरपंच किरण खोब्रागडे, माजी जि.प.सदस्य रत्नदीप दहिवले, पं.स. सदस्य अल्का बांबोळे, प्रा.कल्पना सांगोळे, प्राचार्य गजेंद्र गजभिये, सुखदेव दहिवले, गोविंदा मेश्राम, डॉ. भारत लाडे उपस्थित होते. यावेळी बडोले यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकातून प्रा.संजय शहारे यांनी सुसज्ज बौध्दविहार, स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालयाची स्थापना करणे तसेच गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्याप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातही दारूबंदी लागू करावी यासह अनेक मागण्या केल्या. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश नंदेश्वर यांनी केले.
राजेंद्र लाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बौध्द समाज तालुका अर्जुनी-मोरगावचे पदाधिकारी, भारतीय बौध्द महासभा तसेच समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)