शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
3
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
4
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
5
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
6
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
7
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
9
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
10
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
11
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
12
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
13
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
14
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
15
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
16
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
17
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
18
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
19
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

हवेत गोळीबार करून २.२४ लाखांनी व्यावसायिकाला लुटले

By नरेश रहिले | Updated: January 22, 2025 18:22 IST

तिघांचे कृत्य: एक राऊंड फायर केला

नरेश रहिलेगोंदिया: गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जुनेवानी ते मंगेझरी रोडवरील जंगल परीसरात बंदुकीच्या धाकावर एका व्यापाऱ्याला २ लाख २४ हजाराने लुटल्याची घटना २१ जानेवारीच्या रात्री ११.४५ वाजता घडली. आरोपींनी एक राऊंड हवेत फायर करून त्यांच्या मनात धडक भरली. या संदर्भात तिन्ही अनोखळी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिरोडाच्या सुभाष वॉर्डातील गौरव सेवकराम निनावे (३३) हे मित्र दृश्यत रेबे यांचा पुतण्या राम रेबे यांच्या लग्नाचा स्वागत समारोह २१ जानेवारी रोजी पलाश रिसोर्ट दांडेगाव येथे असल्याने त्या कार्यक्रमासाठी आकाश नामदेव नंदरधने (३२) रा. तिरोडा यांच्यासोबत चारचाकी वाहन एमएच ३५ एजी १८३६ गाडीने तिरोडा येथून रात्री ९ वाजता पलाश रिसोर्ट येथे गेले होते. पलाश रिसोर्ट येथील कार्यक्रमाला रात्री ११:३० वाजता पलाश रिसोर्टचे बाहेर लावलेले रेडीयम एरो मुळे निनावे हे १० मिनीटांनी जुनेवानी गावात आले. जुनेवानी गावापासून काही अंतरावर पुढे गेल्यावर सिंमेट रस्ता संपून कच्चा रस्ता सुरु झाला. १ किमी अंतरावर निनावे यांच्या कारच्या पुढे पल्सर मोटारसायकलवर ३ व्यक्ती ट्रीपल सिट जातांना दिसले. त्यानी मोटारसायकल थांबवून कारला हात दिला. तिघेही मंकी कैंप घालून त्यावर स्कार्फ गुंडाळुन होते. त्यापैकी दोघे निनावे यांच्या बाजुला व एक व्यक्ती आकाशच्या बाजुला आल्याने कारचे खिडकीचे काच खाली उतरवून आकाश याने त्याला हा रस्ता कुठे जात आहे असे विचारताच त्या तिघांनी त्याचाजवळ असलेल्या पिस्तुल काढुन निनावे व आकाशच्या कानाजवळ लावली. तुमच्या जवळ जो सामान आहे तो काढून द्या असे म्हटले. ते दोघेही घाबरल्याने थोडा वेळ गप्प राहीले. यात त्यांनी त्या दोघांच्या जवळून २ लाख २४ हजार ५०० रूपयाचा माल हिसकावून नेला. आरोपींवर गंगाझरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३ (५), ३५१(२), सहकलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा करीत आहेत. 

आकाशच्या हातात ठेवली बंदुकीची गोळी अन् केला फायरआकाशच्या बाजुला असलेल्या तरूणाने आकाशच्या हातात एक बंदुकीचा गोळी देवुन तुम्हाला गम्मत वाटते काय असे म्हणत त्याने बंदुकीतुन एक रांऊड हवेत फायर केला. अन् दागिणे लुटून नेले.

हे हिसकावले साहित्यनिनावे यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची साखळी किंमत १ लाख २० हजार, दोन सोन्याचा अंगठ्या ६ ग्रॅम व ८ ग्रॅम वजनाची एकावर ईंग्रजीत जी व दुसरीवर त्रिशुलचे चिन्ह असलेली किंमत ६० हजार, हातातील चांदीचा कडा किंमत ६ हजार ५०० रुपये, पर्स मधील १८ हजार रूपये असा एकूण २ लाख ४ हजार ५०० व आधार कार्ड व मोदी जॅकेट जबरीने हिसकावुन घेतला. आकाशची सोन्याची आंगठी ४ ग्रॅम वजनाची किंमत २० हजार रूपयाची जबरीने हिसकावली.

पोलिसात तक्रार केल्यास घरात येऊन ठोकून काढूनिनावे यांचा आधार कार्ड आरोपी घेऊन गेले. आधार कार्ड कशाला नेता असे विचारले असतांना तुम्ही पोलिसांकडे गेले तर तुम्हाला तुमच्या घरी येऊनठोकून काढू अशी धमकी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीtheftचोरीgondiya-acगोंदिया