बस आणि स्कॉर्पिओची समोरासमोर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 23:50 IST2019-07-20T23:49:31+5:302019-07-20T23:50:25+5:30
बस आणि स्कॉर्पिओची समोरासमोर धडक झाल्याने बसमधील बारा प्रवासी जखमी झाल्याची घटना तालुक्यातील जांभुळटोला फाट्यावर शनिवारी (दि.२०) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. जखमी प्रवाशांना उपचारार्थ गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

बस आणि स्कॉर्पिओची समोरासमोर धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : बस आणि स्कॉर्पिओची समोरासमोर धडक झाल्याने बसमधील बारा प्रवासी जखमी झाल्याची घटना तालुक्यातील जांभुळटोला फाट्यावर शनिवारी (दि.२०) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. जखमी प्रवाशांना उपचारार्थ गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, साखरीटोल्यावरुन गोंदियाकडे तिगाव मार्गे येणारी बस आणि सामोरुन येणाऱ्या स्कॉरपिओ यांच्यात जांभुळटोला फाट्यावर धडक झाली. यात बस मधील १२ प्रवाशी जखमी झाले.
यापैकी ४ प्रवाशी गंभीर असून ८ प्रवाशी जखमी झाले. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांमध्ये उर्मिला भोजराज वालदे (४८) रा.परसोडी, ता.देवरी, तारा हिरालाल कावळे (४१), गायत्री रामलाल पारधी (४१), कौसल्या केशव सोनवाने (६३) यांचा समावेश आहे.
जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये निर्मला जनबंधू,मनोरमा साखरे, चंद्रकला दोनोडे, ममता जयेंद्र शिवणकर, तोरण पुजारी, रुपा पुराम,उत्पा भैसारे, मिरा पोरामल यांचा समावेश आहे.
आमगाव पोलिसांनी बस व स्कॉरपिओ चालकाच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद केला आहे.गंभीर जखमींना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तर इतर जखमींवर आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
सिटीस्कॅन बंद असल्याने नागरिकांचा संताप
अंगणवाडी सेविकांच्या वाहनाला अपघात झाल्याने जखमी सेविकांना उपचारासाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. परंतु येथील जखमींच्या उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील सिटीस्कॅन मशीन बंद असल्याने या संदर्भात बजरंग दलाने संताप व्यक्त करीत वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. व्ही.पी. रूखमोडे यांच्याशी चर्चा करून त्यांना उपचार करण्यास बाध्य करण्यात आले. आंदोलनाची नेतृत्व मनोज मेंढे, अभिमन्यू चतरे, राजू महारवाडे, सुनिल कोहळे, राजेश करोशिया, प्रकाश शिवणकर, सागर सिक्का व इतर उपस्थित होते.