शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालयात पदाधिकाऱ्यांच्या हातात झाडू

By admin | Updated: October 3, 2015 01:32 IST

जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशनद्वारे २५ सप्टेंबर ते ११ आॅक्टोबरदरम्यान राबविण्यात येत असलेल्या ..

जि.प.त स्वच्छता मोहीम : श्रमदानातून केली कार्यालय व परिसराची स्वच्छतागोंदिया : जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशनद्वारे २५ सप्टेंबर ते ११ आॅक्टोबरदरम्यान राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्वच्छता अभियानात शुक्रवारी अनोखा उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या चार मजली इमारतीसह विस्तीर्ण आवारात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात स्वत: पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी हातात झाडू पकडून परिसराची स्वच्छता केली.या स्वच्छता मोहीमेत जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे, उपाध्यक्ष रचना गहाणे, सभापती पी.जी.कटरे, विमल नागपुरे यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) आर.एल. पुराम, पाणी व स्वच्छता विभागाचे राजेश देशमुख तसेच जिल्हा कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे, कार्यकारी अभियंता (ल.पा.) यांच्यासह सर्व विभागप्रमुख सहभागी झाले.सुरुवातीला महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री व जयप्रकाश नारायण यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून अध्यक्ष उषाताई यांनी उपस्थित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. त्यानंतर सर्वांनी जिल्हा परिषदेचा परिसर स्वच्छ केला. तसेच सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयाची अंतर्गत साफसफाई केली.या स्वच्छता अभियानाची प्रेरणा घेऊन महिन्यातून एकदा अशी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे उषाताई मेंढे यांनी यावेळी सांगितले. उपाध्यक्ष गहाने यांनी अशी मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येईल, तसेच जि.प. परिसरात असलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करून कार्यालयाची नियमित स्वच्छता करण्यात यावी, असे सूचविले.सदर स्वच्छता मोहिमेकरिता उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधीक्षक गौतम, कार्यक्रम व्यवस्थापक येरपुडे यांच्यासह दिशा मेश्राम, रहमतकर, राजेश उखळकर, अतुल गजभिये, देवानंद बोपचे, मुकेश त्रिपाठी, भागचंद रहांगडाले, पदलमवार, बाळकृष्ण पटले, तृप्ती साकुरे, विशाल मेश्राम, शोभा फटिंग, छाया सहारे, सचिन रोडी, रमेश उदयपुरे आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (जिल्हा प्रतिनिधी)मोहिमेत सातत्य राहील का?जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना घेऊन स्वच्छता मोहीम राबविल्यामुळे हा परिसर निश्चितच स्वच्छ आणि सुंदर झाला आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या इमारतींचे अनेक कोपरे खर्ऱ्याच्या पिचकाऱ्यांनी सतत रंगलेले दिसतात. स्वच्छतागृहांमध्ये दुर्गंधी पसरलेली असते. हे चित्र बदलण्यासाठी अशा पद्धतीची मोहीम सातत्याने राबविणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे स्वच्छता राखण्याविषयी सर्वांना शपथही देण्यात आली. मात्र ही शपथ कर्मचारी गांभिर्याने घेतील का, याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे. मात्र मोहिमेत सातत्य ठेवल्यास सर्वांना शिस्त लागण्यास निश्चितच मदत होणार आहे. हे सातत्य राहील का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.