शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय अस्तित्वासाठी बौध्द समाज एकवटणार

By admin | Updated: September 16, 2014 23:50 IST

बौध्द समाजाच्या होत असलेल्या राजकीय अध:पतनाला आळा घालण्यासाठी तालुक्यातील बौध्द समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारमंथन बैठकीचे आयोजन करून निवडणुकीसंदर्भात

अर्जुनी/मोरगाव : बौध्द समाजाच्या होत असलेल्या राजकीय अध:पतनाला आळा घालण्यासाठी तालुक्यातील बौध्द समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारमंथन बैठकीचे आयोजन करून निवडणुकीसंदर्भात रणशिंग फुंकले. विधानसभा निवडणुकीत समाजाच्या वतीने एकच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.ही सभा १४ सप्टेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते सोनदास गणवीर यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली. १९ सप्टेंबर रोजी कालीमाटी (प्रतापगड) येथे आयोजित बौध्द समाजाच्या चिंतन बैठकीत याबाबतची रुपरेषा ठरणार आहे. या बैठकीत तालुक्यातील गटागटात विखुरलेल्या बौध्द समाजाला एकत्रित करून समाज संघटनेचे बळकटीकरण करणे, आंबेडकरी चळवळीला अधिक गतीमान करणे, राजकीय क्षेत्रात समाजाची होत असलेली गळचेपी व पिछेहाट दूर करणे, संघटित होऊन आगामी निवडणुकांमध्ये सामाजिक अस्तित्वाचे प्रदर्शन करणे या संदर्भात निर्णय घेण्यात आले. १९६२ पासून संयुक्त एकीकृत रिपब्लीकन पक्षाने अनेक खासदार व आमदार निवडून आणले. ही बाब काही विघ्नसंतोषी पुढाऱ्यांच्या मनात खटकल्याने रिपब्लीकन पक्षात खिंडार पाडण्याचे कटकारस्थान रचण्यात आले. अखेर विविध गटात ताटातूट झाली व सत्तापिपासू नेत्यांनी आपापली वेगळी दुकानदारी थाटली. येथेच बौध्द समाजाचे राजकीय अस्तित्व संपल्याने मातब्बर पुढाऱ्यांनी समाजाचे खच्चीकरण सुरू केले आहे. दुभंगलेल्या या समाजाचे एकत्रीकरण व्हावे व समाजाच्या एकतेचे प्रदर्शन दाखविण्याच्या दृष्टीने अर्जुनी/मोरगाव तालुका बौध्द समाज संघटनेची कार्यकारिणी गठित करण्यात आली. यात अध्यक्ष सोनदास गणवीर, उपाध्यक्ष व्यंकट खोब्रागडे, सचिव यशवंत गणवीर, सहसचिव सुरेंद्रकुमार ठवरे, कोषाध्यक्ष नाना शहारे तर सदस्य म्हणून सुभाष मेश्राम, गोपाल रामटेके, चंद्रभान टेंभुर्णे, दलित भोयर, मोरेश्वर धारगावे, राहुल रामटेके, राजू लाडे, हिवराज रामटेके व शीतल लाडे यांची एकमताने निवड करण्यात आली.